कोथळे खून खटला : पस्तीस साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर

कोथळे खून खटला : पस्तीस साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर

सांगली - अनिकेत कोथळे खून खटल्याबाबत आज जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयात ३५ साक्षीदारांची यादी सादर करण्यात आली. साक्षी नोंदवण्याचा कार्यक्रमही सादर केला आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. दरम्यान, २९ एप्रिलपासून यावर नियमित सुनावणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह साथीदारांनी अनिकेत कोथळेचा कट रचून खून केल्याचा युक्तीवाद ॲड. निकम यांनी मागील सुनावणीवेळी केला होता. कामटेसह साथीदारांवर प्रस्तावित केलेले दहा आरोप ठेवावेत, अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली होती. 
त्यानंतर १२ मार्च रोजी झालेल्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे एकूण ७६ दस्त ऐवजांची यादी न्यायालयात सादर केली.

त्याबाबत बचाव पक्षाला कायद्यातील तरतुदीप्रमाणे यादी नोटीस देण्यात आली. त्यानुसार २२ मार्चला सुनावणी झाली. त्यावेळी संशयितांच्या सहा वकिलांपैकी दोन वकिलांनी पंचनाम्यात नमूद असलेल्या पंचांच्या नावासह महत्त्वाच्या रासायनिक प्रयोगशाळेतील अहवाल आणि उत्तरीय तपासणीच्या अहवालासह अन्य मुद्द्यावर आक्षेप घेतला होता. मात्र न्यायालयाने दोन्ही वकिलांचे आक्षेप फेटाळून लावले. त्यानंतर आज ॲड. निकम यांनी ३५ साक्षीदारांची यादी तसेच त्यांच्या साक्षी नोंदवण्याबाबतचा कार्यक्रम न्यायालयात सादर केला आहे. पहिल्या दिवशी पाचजणांच्या साक्षी नोंदवण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com