अनिल घनवट याला सहा महिने तुरुंगवास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

श्रीगोंदे - महावितरण अधिकाऱ्याला शिवीगाळ व मारहाण केल्याबद्दल शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांना न्यायालयाने सात महिने तुरुंगवास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

श्रीगोंदे - महावितरण अधिकाऱ्याला शिवीगाळ व मारहाण केल्याबद्दल शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांना न्यायालयाने सात महिने तुरुंगवास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

न्यायाधीश राहुल कुलकर्णी यांनी हा निर्णय दिला. सरकारी वकील डी. बी. इंगळे म्हणाले, 'लिंपणगाव येथील शेतकऱ्याचे मीटर काढल्याने चार वर्षांपूर्वी महावितरण अधिकाऱ्याला घनवट यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. त्या वेळी त्या अधिकाऱ्याने घनवट याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.''

सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून न्यायालयाने घनवट यांची निर्दोष मुक्तता केली; मात्र सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण व शिवीगाळ केल्याबद्दल सात महिन्यांचा कारावास व तीन हजार रुपये दंड केला.

Web Title: anil ghanwat crime punishment