तंदुरूस्ती का राज कोल्हापुरी मटण: अनिल कपूर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

अनिल कपूर म्हणाले, "फुल खिले गुलशन गुलशन' या मालिकेच्या निमित्ताने 1977 साली कोल्हापुरात आलो. असिस्टंट प्रॉक्‍डक्‍शन मॅनेजर म्हणून काम करता करता येथेच काढलेल्या फोटो रिझ्यूम मुंबईला पाठवले आणि त्या फोटोंवरच मला कामे मिळत गेली.'' 

कोल्हापूर : चाळीस वर्षापूर्वी कोल्हापुरात आलो... इथल्या मातीत करियरला प्रारंभ केला आणि त्या मातीनेच मला यशाची शिखरं पादाक्रांत करण्याची ताकद दिली... "मेरे तंदुरूस्ती का राज कोल्हापुरी मटण है'....असा दिलखुलास संवाद आज बॉलीवूडचा "नायक' अनिल कपूर यांनी आज कोल्हापूरकरांशी संवाद साधला.

जगातील पाचव्या क्रमांकाची ज्वेलरी रिटेलर असणाऱ्या मलाबार गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी शोरूमचे आज त्यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. दुपारी बाराच्या सुमारास अनिल कपूर यांचे आगमन झाले आणि हजारो चाहत्यांनी त्यांना गराडा घातला. उद्‌घाटन सोहळ्यानंतर खास चाहत्यांसाठी त्यांनी "वन टू का फोर' आणि "आजा पिया आयी बहार' या गाण्यांवर नृत्याविष्कार केला. "गणपती बाप्पा मोरया', "आला रे आला शिवाजीराव गायकवाड आला' अशा घोषणांनी व्हीनस कॉर्नर चौक दुमदुमून गेला. 

अनिल कपूर म्हणाले, "फुल खिले गुलशन गुलशन' या मालिकेच्या निमित्ताने 1977 साली कोल्हापुरात आलो. असिस्टंट प्रॉक्‍डक्‍शन मॅनेजर म्हणून काम करता करता येथेच काढलेल्या फोटो रिझ्यूम मुंबईला पाठवले आणि त्या फोटोंवरच मला कामे मिळत गेली.'' 

खास तरूणाईला मूलमंत्र देताना ते म्हणाले, "जिद्द आणि चिकाटी ठेवा. कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला यशस्वी करण्याची ताकद या कोल्हापूरच्या मातीत आहे.'' दरम्यान, यावेळी मलाबार समूहाचे व्यवस्थापकीय संचालक ओ. आशेर, रिजनल हेड एम. पी. सूबेर आदी उपस्थित होते. 

Web Title: Anil Kapoor in Kolhapur