चार लाख पशुधनावर चारासंकट

Fodder
Fodder

सातारा - दुष्काळाची झळ माणसांबरोबर आता प्राणी, पशुपक्ष्यांनाही सोसावी लागत आहे. अपुऱ्या पावसामुळे चारा उत्पादन न झाल्याने माण, खटावमधील तब्बल चार लाख पशुधनांवर चारासंकट कोसळले आहे.

पश्‍चिमेकडील भाग वगळता माण, खटावमध्ये अनुक्रमे महिना, दोन महिने पुरेल इतकाच चारा सध्या उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासनाने त्यावर मात करण्यासाठी दोन हजार २३१ हेक्‍टरवर चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.

विदर्भ, मराठवाड्यासह पश्‍चिम महाराष्ट्रालाही दुष्काळाचा दाह लागत आहे. दिवसेंदिवस त्याची तीव्रता वाढत असल्याने दुष्काळी पट्ट्यात जगणे मुश्‍किल होण्याची स्थिती आहे. पाणीटंचाईबरोबर आता चाराटंचाईचेही संकट आ वासून उभे राहिले आहे. माण, खटाव तालुक्‍यांसह कोरेगाव, फलटण, कऱ्हाड, खंडाळा तालुक्‍यांतील काही भागांत तीव्र चाराटंचाईची चिन्हे निर्माण झाली आहेत. माण तालुक्‍यात ८९ हजार १८३ लहान व मोठी; तर १ लाख ७३ हजार १५१ शेळ्यामेंढ्या असून, त्यांना प्रतिदिन १४७० मेट्रिक टन चारा लागत आहे; तसेच खटाव तालुक्‍यात ७९ हजार १६८ लहान व मोठी; तर ४७ हजार ८३३ शेळ्यामेंढ्या असून, त्यांना प्रतिदिन ११४० मेट्रिक टन चारा लागत आहे. 

दुष्काळामुळे निर्माण होणाऱ्या चाराटंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत नियोजन केले जात आहे. जिल्ह्यातील आठ हजार ४६० शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी ७० किलो मका बियाणे दिले जाणार आहे.

त्यासाठी दोन हजार २३१ हेक्‍टरवर एक लाख ३७ हजार ३०५ मेट्रिक टन चारा उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. त्यापैकी माणमध्ये ४५ हजार ५०९; तर खटावमध्ये १२ हजार १२० मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) संजय पाटील यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com