KeralaFloods: केरळमधील प्राण्यांच्या मदतीला ऍनिमल राहत !

परशुराम कोकणे
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

केरळमधील जलप्रलयानंतर जगभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. कोणी खाण्याचे साहित्य, धान्य पाठवत आहे, तर कोणी आर्थिक मदत पाठवत आहे. सोलापुरातील ऍनिमल राहत संस्थेच्या डॉक्‍टरांसह आठ जणांचे पथक केरळमधील प्राण्यांना रेस्क्‍यू करून उपचारासाठी रवाना झाले आहे. 

सोलापूर: केरळमधील जलप्रलयानंतर जगभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. कोणी खाण्याचे साहित्य, धान्य पाठवत आहे, तर कोणी आर्थिक मदत पाठवत आहे. सोलापुरातील ऍनिमल राहत संस्थेच्या डॉक्‍टरांसह आठ जणांचे पथक केरळमधील प्राण्यांना रेस्क्‍यू करून उपचारासाठी रवाना झाले आहे. 

ऍनिमल राहत ही संस्था अनेक वर्षांपासून सोलापुरात कार्यरत आहे. संकटातील प्राण्यांना रेस्क्‍यू करून त्यांच्यावर उपचार करण्याचे काम ऍनिमल राहत संस्थेकडून केले जाते. केरळमध्ये पूर आल्यानंतर माणसांसह प्राण्यांनाही जीव गमवावा लागत आहे. मदत मिळत नसल्याने डोळ्यासमोर प्राण्यांचा जीव जात आहे. तेथील प्राणी संघटनांच्या विनंतीनंतर सोलापुरातील ऍनिमल राहत संस्थेने जनावरांच्या डॉक्‍टरांसह आठ जणांचे पथक पाठविण्याचा निर्णय घेतला. जलप्रलयात रेस्क्‍यू आणि प्राण्यांवर उपचार करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. राकेश चित्तोडा यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

या टीममध्ये डॉ. चेतन यादव, भीमाशंकर विजापुरे, आनंद बिराजदार, माधवानंद पवार, किरण नाईक, कौस्तुभ पोळ, प्रसाद सूर्यवंशी, एस. एस. नायर या आठ जणांचा समावेश आहे. सोबत ट्रक भरून चारा, प्राण्यांसाठी खाद्य नेण्यात आले आहे. तसेच प्राण्यांना रेस्क्‍यू करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या साहित्यासह वाहनही आहे.

Web Title: Animal Rahat help relief Animal in kerala flood