पशुधन विकास अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

तक्रारदारास दोन हजार 500 रुपयांची मागणी करण्यात आली होती.

सातारा : आईचे  नावे असलेल्या एक हजार मांसल कुक्कुट पक्षी संगोपन योजने अंतर्गत उभारण्यात आलेल्या पोल्ट्री शेड बाबतचे अनुदानाची फाईल वरिष्ठांना सादर करण्यासाठी बरड, ता. फलटण येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांतील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी दिलीप महादेव नाझीरकर (वय.५०) यास शुक्रवारी दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

 

नाझीरकर यांनी दोन हजार 500 रुपयांची मागणी तक्रारदारांक़डे केली होती. तडतोडीअंती दोन हजार त्यांनी स्विकारले असता त्याच्यावर लाचलुचपत अधिकाऱ्यांनी कारवाई केली. हि कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील संजय अडसूळ, प्रशांत ताटे, संभाजी काटकर, विशाल खरात, तुषार भोसले यांनी पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुण्याचे राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Animal wealth development officer caught in bribe