अंकिता रैनाचा सोलापूरात डबल धमाका! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 December 2019

नैकता बेंस उपविजेती 
ब्रिटनच्या नैकता बेंसचा सरळ सेटमध्ये पराभव केला. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले. नैकता बेंसला जामश्री रियालटीचे संचालक राजेश दमाणी तर विजेत्या अंकिता रैनाला प्रिसिजन कॅमशाफ्ट्‌सतर्फे आदित्य गाडगीळ यांच्या हस्ते धनादेश व चषक देऊन गौरविण्यात आले. 

 सोलापूर : प्रिसिजन सोलापूर ओपन महिलांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत भारताच्या दुसऱ्या मानांकित अंकिता रैनाने ग्रेट ब्रिटनच्या नैकता बेंसचा भेदक सर्व्हिसच्या साहायाने 6-3, 6- 3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून प्रिसिजन चषक पटकाविला. तर, दुहीरीतही ती विजेती ठरली. आशा पद्धतीने तिने सोलापूरात डबल धमाका केला. 

हेही वाचा : विराट एनकाऊंटर स्पेशालीस्ट 

या स्पर्धेत अंकिता रैनाने उत्कृष्ट बॅक हॅण्ड, ड्राइव्ह, फोर हॉण्ड व भेदक सर्व्हिस करत उपस्थितांची दाद मिळविली. व्ही. आर. पवार सारीजतर्फे राजेश पवार व दीपक पवार यांनी अंकिता रैना व नैकता बेंसला भेटवस्तू दिल्या. याप्रसंगी खेळाडूंची दळण वळणाची उत्कृष्ट व्यवस्था केल्याबद्दल गांधी ह्युंदाईचे संचालक ब्रिजेश गांधी, माया खंडी, निधी शहा, सुधीर सालगुडे आदींचा अंकिता रैनाच्या हस्ते भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धेत बॉल पिकर म्हणून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जय गायकवाड व शंभू पवार, स्पर्धेत उत्कृष्ट छायाचित्रे टिपल्याबद्दल छायाचित्रकार रामदास काटकर यांचा नैकता बेंसच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. 
संघटनेचे मानद सचिव राजीव देसाई यांनी सूत्रसंचालन केले. 

हेही वाचा : ऑस्ट्रिेलियाचं हे जरा अतिच होतंय: गांगुली 

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना, सुहास आदमाने, समर्थ सहकारी बॅंक, पी. एन. गाडगीळ अँड सन्स, बिपीनभाई पटेल, महावीर मेहता, अली पंजवानी, मनीष बोथ्रा, विजय तापडिया, असीम सिंदगी, आशिष ढोले, जितेंद्र राठी, मनोज भागवत, राजेश पवार, श्रीधर देवसानी, सुनील मदन, अबताफ कारागीर यांचे सहकार्य लाभले. 

अंकिताला दुहेरीचे विजेतेपद 
प्रिसिजन जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेतील दुहेरीचे विजेतेपद भारताच्या अंकिता रैना आणि नॉर्वेच्या अलरिके ऐकेरी या जोडीने पटकाविले. दुहेरीत अंकिता रैना आणि अलरिके ऐकेरी या जोडीने बेर्फु चेंगीझ आणि देस्पिना पापामिचेल या जोडीचा 5-7, 6-4, 10-3 असा पराभव केला. 

स्पर्धेतील क्षणचित्रे 

Image may contain: 8 people, including Aditya Gadgil, people smiling, people standing
सोलापूर : फिरता चषक व यशस्वी खेळाडूंसमवेत विद्यापीठाचे क्रीडा समन्वयक डॉ. सुरेश पवार, प्राचार्य डॉ. एस. व्ही. राजमान्य, प्रा. महेश माने, डॉ. हरिदास बारसकर, प्रा. किरण देशमुख, प्रा. आनंद निंबाळकर, प्रा. राम नागटिळक, प्रा. आनंद चव्हाण आदी. 

Image may contain: 1 person, playing a sport

 

Image may contain: 1 person

Image may contain: one or more people, people playing sports and shoes

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ankita Raina double dhamaka in Solapur!