अंकुश आवताडे यांची उत्पादक शुल्क अधिकारीपदी निवड

प्रशांत माळी
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

आंधळगाव - आंधळगावचे सुपूत्र व वाशिमचे पुरवठा निरीक्षक अंकुश रामचंद्र आवताडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून उत्पादन शुल्क अधिकारी म्हणून निवड झाली.

आंधळगाव - आंधळगावचे सुपूत्र व वाशिमचे पुरवठा निरीक्षक अंकुश रामचंद्र आवताडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून उत्पादन शुल्क अधिकारी म्हणून निवड झाली.

त्यांचे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा आंधळगाव येथे तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे झाले. पदवीचे शिक्षण त्यांनी सोलापूर विद्यापीठ येथे पूर्ण केले. 2002 साली त्यांची भारतीय वायुसेनेत हवामान निरीक्षक म्हणून निवड झाली होती. 15 वर्षांची सेवा केल्यानंतर ते ऑक्टोबर 2017 पासून पुरवठा निरीक्षक म्हणून मंगरूळवीर येथे कार्यरत होते.कोणत्याही विषयाचा मुद्देसुद अभ्यास, निरीक्षण यामुळे भारतीय वायुसेनेत कार्यरत असताना राष्ट्रपतींच्या हवाई दौऱ्यात काम करण्याची संधी त्यांना मिळाली.अंकुश आवताडे यांनी आग्रा येथे कार्यरत असताना साजरी केलेली शिवजयंती सर्वांच्या नजरेत भरणारी होती.भारतीय वायुसेनेत कार्यरत असताना मद्रास विद्यापीठातून हवामान विभागातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले.

सध्या पुणे विद्यापीठातून ते राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत असून भारताच्या राष्ट्रीय राजकारणातील एका दिवंगत नेत्यांच्या जीवनावरती पी.एच.डी.करण्याचा त्यांचा मानस आहे.त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून व आंधळगावातील जनतेतून अभिनंदन होत आहे.

Web Title: Ankush Awatade's duty as the product officer