एफआरपीसाठी आंदोलन अकुंशतर्फे शिरोळ तालुक्यात बंद

एफआरपीसाठी आंदोलन अकुंशतर्फे शिरोळ तालुक्यात बंद

शिरोळ - एफआरपीची रक्‍कम वेळेत न मिळाल्याने, 15 टक्‍के व्याजाची रक्‍कम ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना मिळावी. याकरीता आंदोलन अंकुश संघटनेने आज शिरोळ बंदची हाक दिली होती. या आंदोलनास तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शिरोळमध्ये मात्र कडकडीत बंद पाळण्यात आला.

या आंदोलनामुळे तहसिल कार्यालयावर विविध कामाकरीता आलेल्या नागरीकांची गैरसोय झाली. बुधवारपासुन तालुक्‍यातील गाव चावडया बंद करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलन अंकुश संघटनेने दिली आहे.

शिरोळ, दानोळी, टाकळी, यड्राव, घालवाड, कुटवाड, कनवाड, हेरवाड आदी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. याशिवाय कांही गावात दोन तास बंद पाळुन निषेध नोंदवण्यात आला. शिरोळमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आल्याने तहसिल कार्यालय तसेच पंचायत समिती व तालुका भुमिअभिलेख कार्यालयात आलेल्या नागरीकांची मोठी गैरसोय झाली.

तहसिलदार कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने नाईलाजास्तव शिरोळ तालुका बंदची हक्‍क दिली होती. तालुक्‍यातील सत्तर टक्‍के गावात बंद पाळण्यात आला आहे.

-  धनाजी चुडमुंगे, महादेवराव धनवडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com