माजी मंत्री अण्णा डांगे सांगलीतून पुन्हा इच्छुक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

सांगली - लोकसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी माझ्या नावाचाही विचार करावा, असे म्हणून इच्छुकांच्या रांगेत असल्याचे वक्तव्य केले आहे.

सांगली - लोकसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी माझ्या नावाचाही विचार करावा, असे म्हणून इच्छुकांच्या रांगेत असल्याचे वक्तव्य केले आहे.

राष्ट्रवादीने सांगलीची जागा घ्यावी आपल्याला उमेदवारी द्यावी, आपण लढून जिंकून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसमध्ये उमेदवारीबाबत असलेल्या संभ्रमावस्थेवरून श्री. डांगे यांनी मागणी केली आहे.

निवडणुका जाहीर झाल्या. पण काँग्रेसचा उमेदवारीवर अजून एकमत होऊ शकलेले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत ही जागा काँग्रेसकडे आहे, पण गटबाजीमुळे उमेदवार देण्यात अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचा धागा पकडत श्री. डांगे यांनी आपण सांगली लोकसभा लढवण्यास इच्छुक आहे, असे आज जाहीर केले. 

ते म्हणाले,‘‘तीन वेळा मी सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली. केवळ अडतीस हजारांच्या फरकाने माझा पराभव झाला. यावेळी राष्ट्रवादीने जागा आपल्याकडे घेतली व मला उमेदवारी दिली, तर आपण जिंकू, असा मला विश्वास आहे. श्री. डांगे मागणीमुळे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणात रंगत आली आहे.

Web Title: Anna Dange interested to fight Loksabha