वकील बदलल्याने अण्णा हजारे नाराज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

जळगाव घरकुल गैरव्यवहारातील ४८ आरोपींना धुळे सत्र न्यायालयाने दोषी ठरवून कठोर शिक्षा सुनावल्यानंतर राज्य सरकारने या खटल्यातील विशेष सरकारी वकील बदलला असून, याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. नव्या मुख्य विशेष सरकारी वकिलाचे या खटल्यातील आरोपींशी पूर्वी संबंध होते, असा आरोपही त्यांनी केला आहे.

राळेगणसिद्धी - जळगाव घरकुल गैरव्यवहारातील ४८ आरोपींना धुळे सत्र न्यायालयाने दोषी ठरवून कठोर शिक्षा सुनावल्यानंतर राज्य सरकारने या खटल्यातील विशेष सरकारी वकील बदलला असून, याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. नव्या मुख्य विशेष सरकारी वकिलाचे या खटल्यातील आरोपींशी पूर्वी संबंध होते, असा आरोपही त्यांनी केला आहे. 

या गैरव्यवहाराबाबत अण्णा हजारे यांनी २००३ मध्ये आंदोलन केले होते. अण्णांनी पत्रात म्हटले आहे, की या खटल्यात सुरवातीपासून ॲड. प्रवीण चव्हाण यांनी अभ्यासपूर्वक काम पाहिले असून, त्यांनी आरोपींना शिक्षेपर्यंत पोचवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anna Hazare Angry by Lawyer Change