अण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित

Anna-Hazare
Anna-Hazare

राळेगणसिद्धी - लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीसाठी शोधसमिती स्थापन केली आहे. लवकरच त्यांची नेमणूक करू व निवडणूक कायद्यात सुधारणा, शेतीऔजारे आणि ठिबक संचांवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) 12 टक्‍क्‍यांवरून पाच टक्के करण्याबाबत महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीपर्यंत, म्हणजे 30 जानेवारीपर्यंत निर्णय घेऊ, असे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केंद्र सरकार व मुख्यमंत्र्यांचे दूत या नात्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना दिले.

मुख्यमंत्र्यांचे संदेशपत्र देऊन महाजन यांनी बोलणी केल्यानंतर अण्णांचे समाधान झाले व त्यांनी उपोषण तूर्त स्थगित करीत असल्याचे जाहीर केले. अण्णांनी महात्मा गांधी पुण्यातिथीपर्यंत, म्हणजे 30 जानेवारीपर्यंत आपले उपोषण स्थगित केले आहे. तोपर्यंत सरकारने कार्यवाही केली नाही, तर 30 जानेवारीला उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. अण्णा आजपासून राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषण सुरू करणार होते. या पार्श्‍वभूमीवर महाजन आज सकाळी हजारे यांच्या भेटीस आले. महाजन यांनी सुमारे अडीच तास त्यांच्याशी विविध मागण्यांबाबत चर्चा केली व उपोषणावर तोडगा निघाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com