उक्ती-कृतीमधील फरक केजरीवाल यांना भोवला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

राळेगणसिद्धी - आश्‍वासने खोटी ठरल्याने दिल्लीच्या जनतेने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नाकारले आणि त्यांची जागा दाखवून दिली. माणसाच्या उक्ती-कृतीमध्ये फरक असेल, तर असे होणारच, अशी खरमरीत टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी केली.

दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाचा मोठा पराभव झाला. त्याबद्दल हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले ‘‘ केजरीवाल बोलतात तसे वागत नाहीत. दिल्लीला आदर्श बनविले असते, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. त्यांना सत्तेची हाव निर्माण झाली आहे. पराभवास ते स्वतःच जबाबदार आहेत.’’ गाडी, बंगला व सरकारी सवलती नाकारण्याची आश्‍वासने दिलेल्या केजरीवाल यांनी पुढे या सर्व सवलती घेऊन आमदारांना भरीव पगारवाढही दिली. दिल्लीला आदर्श राज्य बनविण्याचे सोडून ते दुसरीकडे निवडणुका लढवत राहिले. असा टोलाही हजारे यांनी लगावला.

Web Title: anna hazare talking to arvind kejariwal