अण्णांचा गिरीश महाजनांना भेटण्यास नकार; उपोषणावर ठाम

aana--Hazare
aana--Hazare

राळेगणसिद्धी - लोकायुक्त व उपलोकपाल नियुक्तीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून उपोषण सुरु करणार आहेत. आज सकाळी पिंपळनेर येथील संत निळोबाराय व त्यानंतर राळेगणसिद्दीमधील पद्मावती देवीचे दर्शन घेऊन ग्रामस्थ, शालेय विद्यार्थ्यांसह रॅलीने ते उपोषणस्थळी रवाना झाले. 

तत्पूर्वी अण्णांनी ग्रामस्थांसह महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. गावातील यादवबाबा मंदिरासमोर मंडप टाकण्यात आलेला असून, यादवबाबांच्या दर्शनानंतर अण्णा तेथेच उपोषण आंदोलनास प्रारंभ करतील. 

मंत्रिमंडळाने कालच्या (ता.29) बैठकीत लोकायुक्त व उपलोकायुक्त कायद्यातील दुरुस्तीला मंजुरी दिल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारचे आभार मानले होते. तथापि, "कायदा विधानसभा व विधान परिषदेत होतो; त्यामुळे ही मागणी मान्य झाली, असे म्हणता येत नाही. त्यामुळे उपोषण करण्यावर ठाम असल्याचे अण्णांनी कालच स्पष्ट केले होते. त्यानुसार आंदोलनास प्रारंभ होत आहे. 

ग्रामस्थांनी त्यासाठी पद्मावती मंदिरापासून मोठी रॅली काढली आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत ही रॅली यादवबाबा मंदिरापर्यत पोचेल. त्यानंतर तेथे उपोषण सुरू होईल. हजारे यांना पाठिंबा देण्यासाठी गावकऱ्यांनी दिवसभर "गाव बंद' ठेवले असून, ते देखील अबालवृद्धांसह रॅलीत सहभागी झाले आहेत. 

महाजन यांना भेट नाकारली 
लोकायुक्त व उपलोकायुक्तासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सरकारने निर्णय घेतले आहेत. अण्णांनी उपोषण करु नये, यासाठी त्यांचे मन वळविण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आज राळेगणमध्ये येणार आहे. मात्र, अण्णांनी त्यांना भेट नाकारल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे महाजन यांना नियोजित दौरा रद्द झाला असल्याचे सांगण्यात येते. महाजन यांनाच भेट नाकारल्याने आता अण्णांशी चर्चा करण्यासाठी कोण येणार, याविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. महाजन यांना भेट नाकारल्याने बहुदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत:च अण्णांच्या भेटीसाठी येतील, असे सांगितले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com