थांबा, काळजी करु नका मी आलोच..

हुकूम मुलाणी
गुरुवार, 5 एप्रिल 2018

मंगळवेढा (सोलापूर) : विधानसभा निवडणूकीला साधारणता दीड वर्षाचा अवधी शिल्लक असताना काँग्रेस पक्षाकडून विद्यमान आ. भारत भालके हेच दावेदार असले तरी त्यांच्या विरोधात कोण यांचीही उत्सुकता लागून राहिली असताना परिचारक समर्थकाने युटोपियन कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक यांचा फोटो फेसबुक वर टाकून थांबा काळजी करु नका मी आलोच त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा विधानसभेसाठी रंगू लागली आहे.                

मंगळवेढा (सोलापूर) : विधानसभा निवडणूकीला साधारणता दीड वर्षाचा अवधी शिल्लक असताना काँग्रेस पक्षाकडून विद्यमान आ. भारत भालके हेच दावेदार असले तरी त्यांच्या विरोधात कोण यांचीही उत्सुकता लागून राहिली असताना परिचारक समर्थकाने युटोपियन कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक यांचा फोटो फेसबुक वर टाकून थांबा काळजी करु नका मी आलोच त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा विधानसभेसाठी रंगू लागली आहे.                

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात कोणत्याही निवडणूकीला पक्षीय स्वरुप येतं न येतं गटाचे स्वरुप मात्र तात्काळ येते आ. भालके व परिचारक गट हे सध्यातरी प्रबळ दावेदार असले तरी आ. भालके हे हॅट्रीक करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पहिल्या टप्प्यात त्यांना मोठया प्रमाणात निधी मतदारसंघात आणण्यात यशस्वी ठरले असले तरी दुसऱ्या टप्यात मात्र सत्ता बदलाचा परिणाम जाणवला आता सत्ताधारी पक्षाची निष्क्रीयता व निधीबाबत आखाडता हात या मुद्यावर हॅट्रीक करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर सुधारकरपंत परिचारक व आ. प्रशांत परिचारक हे देखील आ. भालकेंच्या विरोधातील उमेदवार होवू शकतात. पैकी प्रशांत परिचारक हे सध्या भाजपाचे सहयोगी सदस्य असून यांच्या विधानपरिषदेचा बराच कालावधी शिल्लक राहणार आहे. त्यामुळे पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात उमेश परिचाक यांच्या नावाची चर्चा सुरु झाली.

सोशलमिडीयात त्यांच्या समर्थनार्थ कमेंटही आल्या. युटोपियन कारखान्याच्या माध्यमातून पंढरपुर व तालुक्यातील ऊसाचे केलेले तालुक्यात उच्चांकी गाळप, पंढरपूर अर्बन बॅकेच्या माध्यमातून केलेले आर्थीक सहाय शिवाय या कारखान्याच्या माध्यमातून केलेले सामाजिक काम यांचा लाभ होवू शकतो. सामुदायिक विवाह सोहळा व राज्यस्तरीय महिला व पुरुष आट्यापाट्या सामान्याचे उत्तम संयोजन यामुळे ते अलिकडच्या काळात अधिक चर्चेत आले.

त्यांचा मंगळवेढ्याशी संपर्कही वाढला. आतापर्यंत ते पडद्यामागचे  सुत्रधार होते पण उमेदवारीच्या बाबत त्यांचे नाव नसले तरी सोशलमिडीयातील त्या पोस्ट मुळे अधिक चर्चेत येवू लागले . शिवसनेचे तिकीटावर निवडणूक लढवलेले समाधान आवताडे हे सुध्दा दावेदार आहेत पण जिल्हयातील नवीन राजकीय घडामोडीत जिल्हापरिषदेसाठी आ परिचारक व आवताडे गट एकत्र आले पण विधानसभेला एकत्र येणार कि स्वतंत्र लढणार हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार असले तरी यासाठी दिड वर्षे प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

Web Title: another candidate for next election is paricharak with mla bhalke