'एसीबी'ची टीम पाहून लाचेची रक्कम टाकली बाहेर !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

कामाचा ठेका पूर्ण झाल्यानंतर अनामत म्हणून भरलेली 14 लाख 16 हजार 645 रुपयांची  रक्कम परत देण्यासाठी ८० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्याला आणि त्यांच्या वाहन चालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. 

सोलापूर : कामाचा ठेका पूर्ण झाल्यानंतर अनामत म्हणून भरलेली 14 लाख 16 हजार 645 रुपयांची  रक्कम परत देण्यासाठी ८० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्याला आणि त्यांच्या वाहन चालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक आल्याचा संशय आल्यानंतर चालकास सांगून लाचेची रक्कम मागच्या दरवाजाने जाऊन घराबाहेर टाकण्यात आली. 

अधीक्षक अभियंता राजकुमार जनार्दन कांबळे ( वय. ५३ वर्षे, रा. प्लॅट नं. ५५, कोनार्क नगर, विजापूर रोड सोलापूर), वाहनचालक कैलास सोमा अवचारे ( वय:३० वर्षे, रा. सावळेश्वर ता. मोहोळ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. आज मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास जुळे सोलापुरात ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Anti Corruption Buero Team Bribery amount