डी मार्टवरही प्लॅस्टीक विरोधी कारवाई

डी मार्टवरही प्लॅस्टीक विरोधी कारवाई

कऱ्हाड : येथील बसस्थानकात पालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्लॅस्टीक विरोधातील कारवाई करत सहा जणांकडून सुमारे तीस हजारांचा दंड वसूल केला. शुक्रवारी (ता.28) सायंकाळी ही धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये सहा व्यापाऱ्यांकडून चाळीस किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करून त्यांना प्रत्येकी पाच हजरा प्रमाणे तीस हजार रूपये दंड सुनावण्यात आला.

यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जिल्हा क्षेत्रीय अधिकारी प्रशांत भोसले, आरोग्य सभापती प्रियांका यादव, अभियंता आर. डी. भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, विद्युत निरीक्षक धन्वंतरी साळुंखे, देवानंद जगताप, अनिल वास्के, दिपाली रेपाळ यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी  श्रीनाथजी ट्रेडिंग कंपनी, महाराजा नॉव्हेल्टीज, गुजरात प्लास्टिक हाऊस, छगन स्टेशनरी नॉव्हेल्टीज, सोलंकी प्लास्टिक हाऊस, प्लास्टिक हाऊस या सहा दुकानांतून  चाळीस हून अधिक किलो प्लास्टिक पिशव्या, नॉन ओहन बॅग, प्लास्टिक ग्लास, थर्माकोल आदी साहित्य जप्त करण्यात आले.

मलकापूर येथील डीमार्ट मॉलवर प्रदूषण मंहामंडळ व येथील नगरपंचायतीच्या पथकाने छापा टाकला. तेथे कमी प्रतीचे प्लास्टिक वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर 5 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. भविष्यात प्लॅस्टीकचा वापर आढळल्यास 10 ते 25 हजारांचा दंड व त्यानंतर थेट गुन्हा दाखल करण्याची सुचना मॉल प्रशासनाला देण्यात आली. नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे विशेष पथकासह सातारा येथील प्रदूषण महामंडळाचे येथील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सायंकाळी डीमार्ट मॉलमध्ये कारवाई केली. त्यात कारवाईत अन्न पदार्थ. कपडे व नॉन ओहन पॅकिंगासाठी कमी प्रतीचे प्लॅस्टीक वापरत अशल्याचे दिसले. त्यांना पाच हजार रुपये दंड केला आहे. पथकात प्रदूषण महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी प्रशांत भोसले, नगरपंचायत अभियंते प्रिया तारळेकर, रामभाऊ शिंदे, सुनील शिंदे, पुंडलीक ढगे यांनी सहभाग घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com