आपला हक्काचा माणूस म्हणून प्रभाकर देशमुख यांना निवडून द्या : अनुराधा देशमुख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

माण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यामुळे प्रचारासाठी खुप कमी कालावधी मिळाला आहे. त्यांच्यावरील प्रचाराचा भार कमी करण्यासाठी त्यांच्या अर्धांगीनी अनुराधा देशमुख यांनी वाड्यावस्त्या पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.

दहिवडी : विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराने वेग घेतला असताना उमेदवारांना वेळ कमी पडत आहे. रात्र थोडी सोंगे फार अशी परिस्थिती असल्यामुळे प्रत्येक गावात पोहचताना उमेदवारांची दमछाक होत आहे. त्यामुळे आपल्या पतीवरील प्रचाराचा भार करण्यासाठी अनुराधा देशमुख ह्या आपल्या हक्काचा माणूस म्हणून प्रभाकर देशमुख यांना निवडून द्या असे आवाहन करत गावागावात बैठका घेत आहेत. 

माण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यामुळे प्रचारासाठी खुप कमी कालावधी मिळाला आहे. त्यांच्यावरील प्रचाराचा भार कमी करण्यासाठी त्यांच्या अर्धांगीनी अनुराधा देशमुख यांनी वाड्यावस्त्या पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. अनुराधा देशमुख यांनी जलयुक्त शिवार तसेच पाणी फाऊंडेशन दरम्यान अनेक गावात भेट दिली. त्या दरम्यान त्यांनी आर्थिक मदत केलीच पण प्रत्यक्षात श्रमदानही केली. त्यामुळे गावागावात त्यांना ओळखणारी माणसं आहेत व त्यांचा दांडगा संपर्क आहे.

याच संपर्काच्या बळावर अनुराधा देशमुख ह्या आता नवीन भूमिकेतून ग्रामस्थांच्या पुढे जात आहेत. आपले पती प्रभाकर देशमुख यांच्या कामाची माहिती देवून निवडून आणण्याचे आवाहन त्या मतदारांना करत आहेत. प्रशासकीय,  जलसंधारण,  शैक्षणिक, आरोग्य आदी क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाबद्दल भरभरुन बोलत आहेत.

अनुराधा देशमुख सांगतात की प्रभाकर देशमुख यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून जसं महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. तसंच प्रभाकर देशमुख यांना सर्व जाती-धर्मातील माणसांना सोबत घेवून आदर्श माण-खटाव घडवायचा आहे. माणसाला माणसासारखं वागवणं हाच धर्म मानूण ते कार्यरत आहेत. अनुराधा देशमुख यांच्या बैठकांना गावागावात चांगला प्रतिसाद मिळत आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anuradha Deshmukh appeal to voters vote for Prabhakar Deshmukh