ॲपेक्स प्रकरण - पोलिसांना चकवा देणार डॉ. शैलेश बरफे अखेर अटकेत

ॲपेक्स प्रकरण - पोलिसांना चकवा देणार डॉ. शैलेश बरफे अखेर अटकेत
Summary

पोलिसांनी सातत्याने विरोध करून त्याला अटक पूर्व जामीन मिळण्यापासून रोखले.

मिरज : सांगली-मिरज रस्त्यावरील बहुचर्चित ॲपेक्स प्रकरणातील प्रमुख संशयित छाती रोग तज्ज्ञ शैलेश बरफे याला महात्मा गांधी चौक पोलिसांनी सोमवारी (२०) रात्री उशीरा अटक केली. गेल्या अनेक महिन्यांपासून डॉ. शैलेश बरफे हा पोलिसांची अटक टाळण्यासाठी न्यायालयीन स्तरावर प्रयत्न करत होता. परंतु पोलिसांनी सातत्याने विरोध करून त्याला अटक पूर्व जामीन मिळण्यापासून रोखले. अटक टाळण्यासाठी बरफे याने जिल्हा सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात प्रयत्न केले.

ॲपेक्स प्रकरण - पोलिसांना चकवा देणार डॉ. शैलेश बरफे अखेर अटकेत
गद्दारांना तिथेच दोन लावा, पोलिस केसेसचं मी पाहतो - सुनील केदार

याप्रकरणात बरफे हा अटक झालेला सोळाव्या क्रमांकाचा संशयित आहे. त्याच्याविरुद्ध निष्काळजी आणि बेजबाबदारपणे उपचार करून रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी पोलिसांना सातत्याने चकवा देत राहिला. पोलिस मागावर असताना त्याने जिल्हा सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. परंतु पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी विरोध करून बरफे याला अटकपूर्व जामीन पासून रोखले त्यानंतर त्याला २० सप्टेंबर रोजी सायंकाळी अटक करण्यात आली. या प्रकरणात अटक झालेल्या बर्फे हा सोळाव्या क्रमांकाचा संशयित आहे. यापुढेही या प्रकरणाचा तपास सुरूच राहणार असल्याचे महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस सहाय्यक निरीक्षक रविराज फडणीस यांनी सांगितले.

ॲपेक्स प्रकरण - पोलिसांना चकवा देणार डॉ. शैलेश बरफे अखेर अटकेत
चटपटीत चवीचा नाश्ता, 'कोबी पराठे'; वाचा सोपी रेसिपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com