धार्मिक भावना दुखावाणाऱ्या आप्पासाहेब समिंदर यांनी मागीतली माफी 

हुकूम मुलाणी
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

मंगळवेढा  - सिमोल्लंघनाचे रितसर निमंत्रण देण्यास गेलेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या समोर उद्धट वर्तन करून धार्मिक भावना दुखावाणाऱ्या तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांनी झाल्या प्रकरणी प्रांत अधिकारी यांच्यासमोर माफी मागीतली. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला.

मंगळवेढा  - सिमोल्लंघनाचे रितसर निमंत्रण देण्यास गेलेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या समोर उद्धट वर्तन करून धार्मिक भावना दुखावाणाऱ्या तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांनी झाल्या प्रकरणी प्रांत अधिकारी यांच्यासमोर माफी मागीतली. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला.

या घटनेची हकीकत अशी की याथील एकविरा माळावरील सिमोलंघनाचा तहसीलदारांचा मान असल्याने याचे निमंत्रणाची तहसीलदारांच्या हातात पत्रिका दिली असता असल्या फालतू प्रथा बंद करा, मी कार्यक्रमाला येणार नाही. त्यावेळेस वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांना न जुमानता आपला तोरा कायम ठेवत कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे मंडळ अधिकार्‍याकडून पुजा उरकून घ्यावी लागली. तहसिलदार समिंदर यांनी 350 वर्षाच्या प्रथेला गालगोट लावून तमाम मंगळवेढेकरांच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून त्यांना बडतर्फ करावे अन्यथा मंगळवेढेकरांसमवेत तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा सर्व पक्षीय कार्यकर्त्यानी दिला.

दरम्यान आज उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी सर्वपक्षीय पदाधिकाय्रासमवेत बैठक घेत तोडगा काढला. यावेळी शहराध्यक्ष मारूती वाकडे, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रा.येताळा भगत, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, राष्ट्रवादी जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विजय खवतोडे, जिल्हा नियोजनचे सदस्य अजित जगताप, लक्ष्मण गायकवाड, भीमराव मोरे, शेतकरी संघटनेचे सिद्धेश्वर हेंबाडे, आदीजण उपस्थित होते.

Web Title: Appasaheb samindar apologizes to religious sentiments