सांगलीकरांनो घाबरू नका; बचावासाठी सैन्यासह सर्व सज्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

सांगली : कृष्णा नदीचा महाप्रलय सुरू असताना सांगलीकरांना आणि कृष्णाकाठच्या यांनी गावातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सैन्य त्यांचा दल अग्निशमन दलाला सह विविध सामाजिक संस्था संघटनांनी प्रचंड ताकत एकवटली आहेत.

सांगली : कृष्णा नदीचा महाप्रलय सुरू असताना सांगलीकरांना आणि कृष्णाकाठच्या यांनी गावातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सैन्य त्यांचा दल अग्निशमन दलाला सह विविध सामाजिक संस्था संघटनांनी प्रचंड ताकत एकवटली आहेत.

बोटीतून या लोकांना बाहेर काढले जात आहे. पाण्याची पातळी वाढणार की कमी होणार याबद्दल या घडीला अधिकृतपणे माहिती हाती येत नसल्याने लोकांमध्ये काहीसा संभ्रम आचा स्थिती आहे परंतु, कुणालाही महापुराच्या आत मध्ये धोका पोहोचणार नाही. कुणी अडकून राहणार नाही. त्यांना वेळीच सुरक्षित स्थळी हलवता येईल या दृष्टीने सर्व यंत्रणा अतिशय नजाकतीने कामाला लागले आहेत. कृष्णा नदीकाठी पलूस-कडेगाव मिरज आणि सांगली शहर या भागांमध्ये वारणा काठी शिराळा आणि वाळवा तालुक्यामध्ये गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे. काही लाख लोक या महापुराने बाधित झालेले आहेत. त्या सार्‍यांना बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी सर्व प्रशासन आणि सामाजिक यंत्रणांनी पुढाकार घेतला आहे.

लष्कराची 39 पथके,  बोटी घेऊन येथे दाखल झालेले आहेत. त्यांनी पाण्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. ज्या लोकांना उंच ठिकाणी सुरक्षित राहता येईल त्यांनी तेथेच आसरा घ्यावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे. ज्या लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे आणि जे लोक आता घराच्या छतावर जाऊन अडकून पडले आहेत त्या लोकांना प्राधान्याने सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. याकामी त्याच्या भागातील संपूर्ण माहिती असलेले स्थानिक लोक आणि सामाजिक कार्यकर्ते यांना मदत करत आहेत सर्व पूरग्रस्तांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाचे आहे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. सुरक्षित रहावे सावध राहावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

sangli


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: appeal to sangli citizens that for not getting afraid pf flood condition