राधानगरी अभयारण्य सभोवताल संवेदनशील क्षेत्र निर्मितीबाबत हरकती पाठविण्याचे आवाहन  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - राधानगरी अभयारण्य सभोवताल पर्यावरण संवेदनशील क्षेत्र निर्मिती करण्यात येत आहे. याबाबतची प्रारूप अधिसूचना केंद्र शासनाकडून 10 जुलै रोजी प्रसिध्द झाली आहे. या अधिसूचनेबाबत काही हरकती व सूचना अधिसूचना 60 दिवसांच्या आत पाठवायच्या आहेत, अशी माहिती विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) व्ही. आर. खेडकर यांनी दिली आहे.   

अधिसूचनेची प्रत वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) व सहा.वनसंरक्षक (वन्यजीव) राधानगरी तसेच वन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) राधानगरी व दाजीपुर यांच्या कार्यालयात अवलोकनासाठी उपलब्ध करून ठेवलेली आहे. कोणास याबाबत काही हरकती अथवा सूचना असल्यास त्यांनी  केंद्र शासनाचे सचिव, पर्यावरण जलवायु परिवर्तन मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोर बाग रोड, अलीगंज, नवी दिल्ली -110003 अथवा ईमेल esz_mef@nic.in वर नोंदवाव्यात. किंवा वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव), सहा.वनसंरक्षक (वन्यजीव) व वन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) राधानगरी व दाजीपुर यांच्या कार्यालयामध्ये हरकती सादर कराव्यात, असे आवाहन श्री. खेडेकर यांनी केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appeal to send objections to creation of sensitive area around Radhanagari Sanctuary