
ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे संवाद साधण्यात आला. यावेळी अडचणींसाठी चोवीस तास टोल फ्री क्रमांक 1091 याबाबत माहिती देण्यात आली. कोरोना काळात दक्षता घेण्याचे आवाहनही पोलिसांनी केले. तसेच कोरोना लस सुरक्षित असून ती घेण्यासाठीचे आवाहनही पोलिसांनी यावेळी केले.
सांगली : ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे संवाद साधण्यात आला. यावेळी अडचणींसाठी चोवीस तास टोल फ्री क्रमांक 1091 याबाबत माहिती देण्यात आली. कोरोना काळात दक्षता घेण्याचे आवाहनही पोलिसांनी केले. तसेच कोरोना लस सुरक्षित असून ती घेण्यासाठीचे आवाहनही पोलिसांनी यावेळी केले.
राज्याचे पोलिस महासंचालक यांच्या आदेशानुसार जिल्हा पोलिस दलातर्फे ज्येष्ठ नागरिक सेल स्थापन करण्यात आला आहे. या सेलमध्ये 25 पोलिस अधिकारी, 25 पोलिस अंमलदार तसेच 16 समाजिक कार्यकर्ते व समुपदेशकांचा समावेश आहे. तसेच व्हॉटस्अप ग्रुपही तयार करण्यात आले आहेत. ज्येष्ठांच्या सुरक्षा आमि अडचणीबाबात चर्चा केली जाते. सन 2019 मध्ये 68, तर सन 2020 मध्ये 13 बैठका घेण्यात आल्या.
पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना बैठका घेण्याबाबत सुचना केल्या. त्यानुसार आज आणि उद्या दोन दिवस बैठकांचे आयोजित जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात करण्यात आले आहे. बैठकीत मांडण्यात येणाऱ्या ज्येष्ठांच्या समस्या तातडीने सोडवण्याचे आदेश पोलिस अधीक्षक गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या जात आहे. याशिवाय कोरोना काळातील घ्यावयाची दक्षता याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. कोरोना लस सुरक्षित असून ती ज्येष्ठांनी घ्यावी, असे आवाहनही पोलिस दलातर्फे करण्यात आले.
"1091' टोल फ्री
ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या असता. त्या मांडायच्या कुठे असा प्रश्न असतो. यावर उपाय म्हणून जिल्हा पोलिस दलाकडून 1091 हा टोल क्रमांकाची सेवा सुरू करण्यात आली आहे. चोवीस तास ही सेवा सुरू असून समस्यांचे तत्काळ निरसन केले जाते. ज्येष्ठांनी या क्रमांकावर समस्या मांडाव्यात, असे आवाहन अधीक्षक गेडाम यांनी केले आहे.
संपादन : प्रफुल्ल सुतार