माजी विद्यार्थ्यांनी पालटले शाळेचे रूप

परशुराम कोकणे
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

सोलापूर - फेसबुक, व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून 28 वर्षांनी एकत्र आलेल्या सिद्धेश्‍वर प्रशाला आणि कन्या प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक भूमिकेतून रविवार पेठेतील गोपाळ विद्यालय ही शाळा दत्तक घेतली आहे. भिंतींना रंगरंगोटी करून शाळा सजविण्यात आली असून, सोमवारी (ता. 14) बाल दिनानिमित्त विद्यार्थ्यांना बसायला सतरंज्या, शालेय साहित्य आणि खेळाचे साहित्य भेट देण्यात येणार आहे.

शाळेतील जुने मित्र, मैत्रिणी एकत्र येऊन स्नेहमेळावा, गप्पा, पार्टी करतात; पण श्री सिद्धेश्‍वर प्रशाला व कन्या प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रमांचा वसा घेतला आहे. 1987-88 या वर्षातील माजी विद्यार्थी एकत्र आले असून, गेल्या दोन वर्षांपासून विविध उपक्रम राबवित आहेत.

पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव डॉ. श्रीकर परदेशी, डॉ. संजय सक्करशेट्टी यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रांत, वेगवेगळ्या पदांवर माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य यात कार्यरत आहेत. देविदास चेळेकर, महेंद्र सोमशेट्टी, भारत जाधव, गिरीश तळपल्लीकर आदींच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम चालू आहेत.
सिद्धेश्‍वर प्रशाला आणि कन्या प्रशाला माजी विद्यार्थी संघटनेचे सामाजिक काम पाहून गोपाळ विद्यालयाने मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. संघटनेच्या सदस्यांनी वर्गणी गोळा करून गोपाळ विद्यालयाचे रूप पालटले आहे. सुशोभीकरण केलेली शाळा बाल दिनाचे सोमवारी (ता. 14) औचित्य साधून हस्तांतर करण्यात येणार आहे.

Web Title: appearance of former students of the school