राज्यातून 171 साखर कारखान्यांचे गाळपासाठी अर्ज

तात्या लांडगे
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

सोलापूर : मागच्या वर्षीचा दुष्काळ अन्‌ चारा टंचाईमुळे उसाचा
झालेला वापर यामुळे सोलापूर जिल्ह्यात 47 हजार हेक्‍टर ऊस शिल्लक राहिला आहे. मागच्या वर्षी जिल्ह्यात 68 हजार हेक्‍टर उसाचे क्षेत्र असताना 28 कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. यंदा जिल्ह्यातील 24 तर राज्यातील 171 साखर कारखान्यांनी गाळपासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. उसाचे क्षेत्र कमी अन्‌ सांगली, कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे यंदाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे साखर आयुक्‍तालयाच्या सूत्रांनी सांगितले. 

सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळात सुमारे 200 चारा छावण्या सुरू झाल्या अन्‌ जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचा सर्वाधिक वापर झाला. तर काही तालुक्‍यात पाण्याअभावी शेतकऱ्यांनी उसाची नांगरट केली. पाण्याअभावी उसाची अपेक्षित वाढही झाली नसून सांगली, कोल्हापूर, सातारा, नाशिक, सोलापुरातील पंढरपूर या ठिकाणच्या पुराचा सर्वाधिक फटका उसालाच बसला. त्यामुळे यंदा राज्यभरात सुमारे साडेपाच लाख हेक्‍टरवर ऊस शिल्लक असून साखर उत्पादनातही मोठी घट होईल, असा अंदाज साखर आयुक्‍तालयाने व्यक्‍त केला. तरीही आगामी गाळप हंगामासाठी राज्यातील 171 साखर कारखान्यांनी 29 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज केले असून त्यात आणखी वाढ होईल, अशीही शक्‍यता आयुक्‍तालयाने व्यक्‍त केली.

सोलापूर जिल्ह्यातील अर्जदार कारखाने
लोकमंगल शुगर, लोकमंगल ऍग्रो, चंद्रभागा, लोकनेते, विठ्ठलराव शिंदे,
पांडुरंग, सहकारमहर्षी, भैरवनाथ शुगर (3), श्री सिद्धेश्‍वर, जकराया,
युटोपियन, विठ्ठल रिफायनरी, फॅबटेक, दि सासवड माळी, गोकूळ शुगर, जयहिंद, संत दामाजी, गोकूळ माऊली, मातोश्री, कुर्मदास आणि विठ्ठल अशा 24 कारखान्यांनी गाळपाच्या परवानगीसाठी साखर आयुक्‍तांकडे ऑनलाइन अर्ज केले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: application from 171 sugar factories