कडकनाथ घोटाळा प्रकरण तपासासाठी सक्षम अधिकारी नेमा 

कडकनाथ घोटाळा प्रकरण तपासासाठी सक्षम अधिकारी नेमा 

कोल्हापूर - कडकनाथ घोटाळा प्रकरणाची सखोल व स्वतंत्रपणे तपास करण्यासाठी एमपीआयडी ऍक्‍ट 1999 कायद्यांतर्गत सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज केली. 

श्री. फडणवीस यांनी सक्षम अधिकारी नेमण्यासह पक्ष्यांना खाद्यपुरवठा तातडीने करण्यासाठी रेशनिंगवरील धान्याचा पुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले.  सैन्यदलासाठी मांसाहार म्हणून लागणारे चिकण, अंडी यांची पूर्तता करण्यासाठी कडकनाथ व त्याची अंडी खरेदी सरकारने स्वत: करावी, प्राणी संरक्षण कायद्यानुसार संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा, फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांचे पोलिसांनी स्वतंत्रपणे व तातडीने गुन्हे दाखल करून घ्यावेत, या मागण्याही शिष्टमंडळाने केल्या. 

दिग्विजय पाटील, विजय आमते, मारूती खाडे, विकास मगदूम, संदीप पाटील, ऍड. विवेक गुरव, अमित शिंदे, बबन मुल्लाणी, सुनील पाटील, सौरभ पडवळे, सागर दिंडे, संतोष निकम, तुकाराम पाटील यांचा समावेश होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com