वाळू चोरीचा गुन्हा तरी पोलीस पाटील पदी नियूक्ती

हुकूम मुलाणी
गुरुवार, 12 जुलै 2018

मंगळवेढा : तालुक्यातील पौट येथील ओढ्यातील वाळू चोरून विकल्याचा गुन्हा दाखल असतानाही सदर इसमाला उपविभागीय अधिकारी यांनी पोलीस पाटील या पदावर नियुक्त केले. त्यामुळे या प्रकरणाची सक्षम अधिकाय्राकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी बशीर मुल्ला यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनव्दारे केली.

याबाबत या निवेदनात म्हटले आहे की पौट येथील पोलीस पाटील पदासाठी 18 मार्च 2008 रोजी दोन महिन्यासाठी हंगामी पदावर नियुक्ति करण्यात आली. पुढे चार वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर पदावर कायम स्वरूपी संधी मिळावी म्हणून मी अर्ज दिला असता कारखान्यातील नोकरीमुळे माझा अर्ज नामंजूर करण्यात आला. पण त्या काळी मी कार्यरत होतो ही बाब विचारात घेतली नाही. उलट नियुक्त दिलेल्या वर स्वत उपविभागीय अधिकाऱ्यांनीच स्वतः पाहणी करून 156/2016 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर वडीलाचे नावे असलेल्या वाहनावर 2 लाख 73 हजार दंड ठोठावण्यात आला. सदर व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य असून वाळू चोरून विकत असल्याबाबत बावची येथील सरपंचानेही तक्रार दिली आहे. त्यामुळे या ओढ्यातील वाळू ही कुंपणच विकणार असल्यास न्याय कुठे मागायचा असा प्रश्न निर्माण झाला.

तक्रारदारास तीन अपत्य असून कारखान्यात नोकरीसही आहे. गुन्हा दाखल होण्यापुर्वीची नियुक्ति आहे. सदरचे प्रकरण चौकशीसाठी तहसीलदाराकडे दिले. चौकशीचा अहवाल प्राप्त होताच सुनावणी घेवून दोघाचे म्हणणे घेणार आहे. त्यात तथ्थ आढळल्यास अपात्र करण्यात येईल. व पुढील कार्यवाही करण्यात येईल.

- प्रमोद गायकवाड
उपविभागीय अधिकारी मंगळवेढा

Web Title: appoint police Patil as the accused of sand theft