नेवासेच्या सभापतीपदी कल्पना पंडीत यांची निवड निश्चित  

सुनील गर्जे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या उपस्थितीत पंचायत समिती आवारात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात माजी आमदार शंकरराव गडाख व माजी सभापती सुनीता गडाख यांच्या हस्ते कल्पना पंडीत यांचा सत्कार करण्यात आला.

नेवासे : नेवासे पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी पंचायत समिती सदस्या कल्पना नाथाभाऊ पंडीत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची पंचाचायत समितीच्या सभापती निवड निश्चित झाली  आहे. मंगळवार (ता. २८) ला दुपारी वाजता पंचायत समीतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रभारी गटविकास अधिकारी अनंत परदेशीच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत या निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे. 

दरम्यान ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या उपस्थितीत पंचायत समिती आवारात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात माजी आमदार शंकरराव गडाख व माजी सभापती सुनीता गडाख यांच्या हस्ते कल्पना पंडीत यांचा सत्कार करण्यात आला. उपसभापती राजनंदिनी मंडलीक याच कायम आहे. 

विद्यमान सभापती सुनिता गडाख यांनी सकल मराठा, धनगर व मुस्लीम आरक्षण मिळावे यासाठी आपल्या सभापती व सदस्य पदाचा या दोन्हीही पदाचा ३१ जुलै ला त्याग करत राजीनामा दिला होता.

Web Title: Appointment of Kalpana Pandit as the Chairman of Nevase