प्राध्यापकांची नेमणूक अन्‌ नॅकचे आव्हान 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठात पन्नास ऍडजंक्‍ट व रिसर्च प्राध्यापक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिविभागांच्या मागण्यांनुसार ही पदे भरण्यात येणार आहेत. 

प्राध्यापकांच्या मंजूर 210 पैकी 114 पदे अद्यापही रिक्त असताना या नेमणुकीने काय साध्य होणार, हाच प्रश्‍न आहे. येत्या वर्षात नॅकला सामोरे जाताना कायमस्वरूपी पदे आवश्‍यक असताना ही नेमणुकीची प्रक्रिया कितपत यशस्वी ठरेल, याभोवती चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे. 

ऍडजंक्‍ट प्राध्यापकांची 25 व रिसर्च प्राध्यापकांची 25 पदे भरण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यांच्या नेमणुकीसाठी निकष, वेतन ठरविले जात आहेत. सहायक प्राध्यापकाची 124, सहयोगी प्राध्यापक 46 व प्राध्यापकांची 40 पदे मंजूर आहेत. त्यापैकी सहायक प्राध्यापकाची 92, सहयोगी प्राध्यापक 24 व प्राध्यापकांची 17 पदे भरली आहेत. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त एकूण 53 पदे मंजूर झाली आहेत. पण, केवळ 16 पदे भरली आहेत. 

तत्कालीन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या कारकिर्दीत विद्यापीठाला नॅकचे "अ' मानांकन मिळाले आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  पुढील वर्षी नॅकतर्फे विद्यापीठाचे मूल्यांकन होणार आहे. नॅक मूल्यांकनात प्राध्यापकांची कायमस्वरूपी पदे भरण्याचा निकष महत्त्वपूर्ण आहे. तशी पदे भरली असतील तर नॅकचे मानांकन टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे. अन्यथा गुणवत्तेचा अट्टाहास धरताना पूर्णवेळ प्राध्यापक पदे का भरली जात नाहीत, असा चर्चेचा सूर आहे. 

शासनाकडून उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा अट्टहास सातत्याने धरला जात आहे. मात्र, शासनाकडून त्याकरिता विधायक कृती होताना दिसत नाही. प्राध्यापकांच्या हजारो जागा रिक्त आहेत. त्या भरायलाच हव्यात. अन्यथा शिकवायलाच प्राध्यापक नाहीत, तर गुणवत्ता येणार कशी? 
- प्रा. आर. डी. ढमकले. 

सुवर्णमहोत्सवी वर्षात मंजूर पदे अशी : 
पद मंजूर भरलेली 
- सहायक प्राध्यापक 31 15 
- सयोगी प्राध्यापक 13 1 
- प्राध्यापक 9 - 

Web Title: The appointment of professors and challenge of NAAC