धर्मस्थळे उघडण्यास मान्यता द्या - सुरेश पाटील

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 July 2020

राज्यातील मंदीर, मशिद, गुरुव्दारा उघडण्यास राज्य शासनाने मान्यता द्यावी. अनेक राज्यांमध्ये ती सुरु आहेत, महाराष्ट्रातच बंदी कशासाठी? एकीकडे दारुची दुकाने सुरु ठेवली जातात आणि धर्मस्थळांना मान्यता दिली जात नाह, हे चुकीचे आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी आज येथे मांडली. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवले. 

सांगली ः राज्यातील मंदीर, मशिद, गुरुव्दारा उघडण्यास राज्य शासनाने मान्यता द्यावी. अनेक राज्यांमध्ये ती सुरु आहेत, महाराष्ट्रातच बंदी कशासाठी? एकीकडे दारुची दुकाने सुरु ठेवली जातात आणि धर्मस्थळांना मान्यता दिली जात नाह, हे चुकीचे आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी आज येथे मांडली. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवले. 

सुरेश पाटील म्हणाले, ""कोरोना संकटकाळाचे लॉकडाऊन हटवून राज्यात मिशन बिगीन अगेन सुरु केले आहे. बाजारपेठा निर्बंधांना अधीन राहून सुरू झाल्या. शहरांतर्गत व राज्यातील बस प्रवासी वाहतूकही टप्प्या टप्प्याने सुरू होत आहे. हॉटेल, उपहारगृहे सरु केली. या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक नियम पाळून मंदिरे, मशिदी, गुरुद्वार, चर्च सुरू करायला मान्यता द्यावी. ठराविक कालावधीची सीमारेषा आखून ती सुरु करावीत. गेली साडेतीन, चार महिने धर्मस्थळे बंद आहेत. मद्य विक्रीला मात्र परवानगी आङे. राज्यातील रेडझोन शहरे वगळता किमान गावागावांमध्ये लहान-लहान मंदिरांना तरी सोशल डिस्टन्सिंग सारख्या नियमांचे पालन करून ती सुरु करण्यास परवानगी द्यावी. थर्मल स्कॅनरचा वापर, आरोग्य सेतूचा वापर, मास्क घालणे बंधनकारक, मूर्तीला स्पर्श करण्यास मनाई, संपूर्ण मंदिराचे निर्जंतुकीकरण या अटी पाळण्यास सारे तयार आहेत.'' 

ते म्हणाले, ""लवकरच श्रावण महिना सुरु होतोय. भाविकांच्या श्रद्धेचा, भावनांचा विचार केला जावा. गुजरात, पंजाब, उत्तरप्रदेश, दिल्ली, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तामिळनाडू कर्नाटक, राजस्थान या सारख्या राज्यात गेल्या एक महिन्यापासून मंदिरे सुरु आङेत. या संकटकाळात समाजाला भावनिक, धार्मिक आधाराची देखील गरज आहे. त्यामुळे कोरोना संकट काळात बंद करण्यात आलेली सर्व मंदिरे, मशिदी, चर्च गुरुद्वार सामाजिक अंतराचे पालन करत तातडीने उघडण्याची गरज आहे. त्यातून समाजाला मोठा मानसिक आधार मिळेल.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Approve to open places of worship - Suresh Patil