..या फुलांनी बहरले ताटवे

गजेंद्र पोळ 
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

- निसर्गप्रेमी मंडळींचे लक्ष वेधून घेतय 
- अनोखे वैशिष्ट्यपूर्ण रचना असणारी दीपमाळ ही वनस्पती 
- शेतामधले ओढे-नाले खळखळून वाहिले 
- सृष्टीचे मोहक रूप निसर्गप्रेमींना करतेय आकर्षित 

चिखलठाण (सोलापूर ) : समाधानकारक पावसामुळे चिखलठाण परिसरातील शेतामध्ये बहरलेले विविध रानफुलांचे ताटवे निसर्गप्रेमी मंडळींचे लक्ष वेधून घेत आहेत. 

गेल्या तीन-चार वर्षांपासून तालुक्‍यात सतत दुष्काळी स्थिती असल्यामुळे शेतामधले ओढे-नाले खळखळून वाहिलेच नाहीत. परंतु यावर्षी परतीचा पाऊस समाधानकारक बरसल्याने गावोगावीचे ओढे नाले जिवंत झाले आहेत. त्यांच्या काठावर वेगवेगळ्या प्रकारच्या वेली व रानफुलांचे ताटवे दिसू लागले आहेत. सृष्टीचे मोहक रूप निसर्गप्रेमी मंडळींना आकर्षित करत आहे.

हेही वाचा : पक्षाने मधमाशांच्या पोळ्यावर हल्ला केला अन्‌..

गवेगळ्या प्रकारची फुले पाहण्यासाठी अनेक निसर्गप्रेमी मंडळी दरवर्षी सातारा जिल्ह्यातील कास पठारावर जात असतात. परंतु, समाधानकारक पावसामुळे करमाळा तालुक्‍यातील चिखलठाण भागात सर्वत्र रानफुलांचे ताटवे व मनमोहक फुलपाखरे दिसू लागली आहेत.

हेही वाचा : ज्वारी, बाजरीची भाकरी महागणार...कारण... 

काही नेहमीच्या फुलांबरोबरच पाखरांच्या माध्यमातून झालेल्या बीजस्थलांतरामुळे परिसरात पूर्वी या परिसरात फारसे न दिसणारी आपले अनोखे वैशिष्ट्यपूर्ण रचना असणारी दीपमाळ ही वनस्पती निसर्गप्रेमी मंडळींचे लक्ष वेधून घेत आहे. 

वनस्पतीची रचना दीपमाळेप्रमाणे 
दीपावलीच्या दिवसांमध्ये फुलणाऱ्या या फुलाचे नाव दीपमाळ असून ल्यामिएसी या कुळातील लिओनोटीस नेर्पेटिफोलीया असे त्याचे नाव आहे ही या वनस्पतीची रचना आपल्या मंदिरासमोरील दीपमाळेप्रमाणे असते म्हणून याच्या फुलांना दीपमाळीचे फुले असे म्हटले जाते. 
- विवेक पाथ्रुडकर, निसर्गप्रेमी शिक्षक, चिखलठाण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: That are the flowers