#Kolhapurflood : कोल्हापूर जिल्ह्यातील 204 गावांना पुराचा फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

कोल्हापूर जिल्ह्यात 204 गावांना पुराचा फटका बसला असून आतापर्यंत 11 हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे एनडीआरएफ 22 पथक कोल्हापुरात दाखल झाले असून त्यांनी मदत कार्य सुरू केले आहे. 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात 204 गावांना पुराचा फटका बसला असून दोन इयर विमानातून त्यांना स्थलांतरित करण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासन आणि मंत्रालय स्तरावर सुरू झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात 204 गावांना पुराचा फटका बसला असून आतापर्यंत 11 हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे एनडीआरएफ 22 पथक कोल्हापुरात दाखल झाले असून त्यांनी मदत कार्य सुरू केले आहे. 

सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील दूर स्थितीत असलेल्या ग्रामस्थ नागरिकांना शक्य तितक्या लवकर बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, लष्कर यासह स्थानिक संस्था कार्यकर्ते नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. स्थलांतरित भागात चहा पाणी नाष्टा जेवण देण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. अनेक नातेवाईक पूरग्रस्तांशी संपर्कात असून स्थलांतरासाठी विनंती करीत आहेत.

कोल्हापूर शहरात 243 जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात 849 कुटुंबीयांतील 3453 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: around 204 villages affected on floods in Kolhapur district