कोपरगावातील बसस्थानकाचा होणार कायापालट  

 मनोज जोशी
गुरुवार, 12 जुलै 2018

आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, की येथील बसस्थानकाची सध्याची इमारत जुनी झाली आहे. तिच्या नूतनीकरणाबाबतचा प्रस्ताव कोपरगाव आगार ते मंत्रालय असा मार्गी लावला आहे.

कोपरगाव - येथील बसस्थानकाची सध्याची इमारत जुनी झालेली आहे. त्यामुळे येथे सुसज्ज बसस्थानकाच्या इमारतीचा प्रस्ताव परिवहन खात्याकडे पाठविण्यात आलेला असून, त्याला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मंजुरी दिलेली आहे, अशी माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली. 

आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, की येथील बसस्थानकाची सध्याची इमारत जुनी झाली आहे. तिच्या नूतनीकरणाबाबतचा प्रस्ताव कोपरगाव आगार ते मंत्रालय असा मार्गी लावला आहे. त्यामुळे सुधारित प्रस्तावास प्रशासकीय मंजुरीचे आदेश 7 जुलै ला राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापक तथा कार्यकारी अभियंता यांनी दिले आहेत. हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहनमंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री विजय देशमुख, पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबई व अहमदनगर आगार यांचे विशेष सहकार्य मिळाले, असे त्या म्हणाल्या. 

पावसाळी अधिवेशनात या प्रश्‍नावर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचे लक्ष वेधल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली आहे. 

मंजूर निधीतून अशी कामे होणार -

 बसस्थानक सुसज्ज इमारती  3 कोटी 48 लाख 17 हजार   163
 वाहनतळ भराव कामासाठी  95 लाख 55 हजार
 संरक्षक भिंतीसाठी  22 लाख 13 हजार 641
 जुनी इमारत पाडण्यासाठी  2 लाख
 विद्युतीकरणासाठी  23 लाख
 बसस्थानकांत आगप्रतिबंधक   उपाययोजनेसाठी  5 लाख
 एकूण  5 कोटी 92 लाख 98 हजार

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Around six crore funds have been sanctioned for Kopargaon bus stand