सांगली पोलिसाच्या खूनाप्रकरणी हल्लेखोरास अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

सांगली : मिरज शहर पोलिस ठाण्याकडील पोलिस कर्मचारी समाधान मांटे
याच्यावर धारदार हत्याराने वार करुन खून केल्या प्रकरणी मुख्य संशयित
हल्लेखोर झाकीर जमादार यास कोल्हापुरात काल (बुधवारी) रात्री अटक करण्यात आली.

कुपवाड रोडवरील हॉटेल रत्ना डिलक्‍स येथे मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. बिल देण्याच्या वादातून हा खून झाला होता. हॉटेलच्या सीसीटीव्हीत खुनाची घटना रेकॉर्ड झाल्याने त्यावरुन शोध घेत पोलिसांनी
झाकीरच्या दोन साथीदारांना अटक केली होती. तर रात्री कोल्हापुरात राजवाडा चौक पोलिसांना त्याला जेरबंद केले.

समाधान मांटे मंगळवारी रात्री ड्यूटी संपवून घरी येताना ते हॉटेल रत्ना
डिलक्‍समध्ये दारू पिण्यास गेले. तेथे काऊंटरवर उभे असताना झाकीर जमादार याचा मॅनेजरशी बिलावरून वाद सुरू होता. त्यावेळी मांटे यांनी त्याला पोलिसी खाक्‍या दाखवला. त्याचा राग येवून झाकीरने आपल्या अतहर नदाफ आणि अन्सार पठाण या मित्रांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर समाधान मांटे हॉटेल व्यवस्थापकाशी बोलत गेटजवळ आले. तेथे झाकीरने हातातील हत्याराने मांटेवर सपासप 17-18 वार केले. यात मांटे जागेवरच ठार झाले.

पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून झाकीरच्या दोन्ही साथीदारांना
हडको कॉलनीतून अटक केली. तर झाकीर सांगलीतून बाहेर पळून गेला होता. त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन कसबे डिग्रज दाखवत होते. त्यावरुन पोलिसांनी त्याच्याबद्दल अधिक माहिती घेतली असता तो कोल्हापूरात शिक्षणासाठी होता. त्यामुळे तेथे त्याचे मित्र होते. तो तिकडे गेला असल्याच्या संशयावरुन कोल्हापुरातही तपासासाठी फिल्डींग लावली.
कोल्हापूरमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत
पिंगळे, गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या
पथकांनी त्याचा शोध सुरु केला. रात्रीच्या सुमारास त्याला राजवाडा
पोलिसांच्या मदतीने कोल्हापुरात अटक केली. त्याला आज सांगलीत हजर करण्यात येणार आहे.

Web Title: arrest criminal of sangali police murder