सोलापूर - मोहोळ येथे चार सट्टेबाजांना अटक

चंद्रकांत देवकते
शुक्रवार, 11 मे 2018

मोहोळ (सोलापूर) : शहरातील एका लॉजवर छापा टाकून आयपीएल सामन्यासाठी जुगार, सट्टा खेळणाऱ्या चार संशयितांना गुरूवारी रात्री ताब्यात घेऊन त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात आली.

मोहोळ (सोलापूर) : शहरातील एका लॉजवर छापा टाकून आयपीएल सामन्यासाठी जुगार, सट्टा खेळणाऱ्या चार संशयितांना गुरूवारी रात्री ताब्यात घेऊन त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात आली.

याबाबत पोलिसाकडुन मिळालेल्या अधिक माहीतीनुसार मोहोळ येथील कुरूल चौकातील लोकसेवा लाॅजमध्ये एका रुममध्ये काही प्रवासी उतरले असुन ते आयपीएल सामन्यासाठी सट्टा जुगार चालवित असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दोन पंचांसह संबंधित हॉटेलच्या संशयित खोलीमध्ये छापा टाकला असता आयपीएलमधील चालू असलेल्या दिल्ली डेअरडेव्हील्स विरूद्ध सनराईजर्स हैद्राबाद या सामन्यावर लोकांना पैश्याचा हवाला देऊन सट्टा जुगार घेत असताना रंगेहाथ सापडले.

यामध्ये, आकीफ सत्तार मुल्ला (वय ३२ रा.भवानीपेठ सोलापुर), सलाम साबीद दलाल (वय ३०  रा.जोडभावी पेट सोलापुर), अस्लम चांद शेख (वय ३० रा.घोंगडेवस्ती सोलापुर), इरफान दावदसाब इनामदार (वय३८  रा.सोलापुर) स्वतःचे अर्थिक फायद्याकरीता हवाला देऊन सट्टा जुगार घेत असल्याप्रकरणी वरील संबंधितावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

या ठिकाणी सापडलेली रोख रक्कम व एक लॅपटाॅप, १७  मोबाईल, एक टी.व्ही, नोट बुक, पेन व कार असा एकुण ७,६४ ,८७०- रूपयाचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. या कामी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेड कॉन्स्टेबल विलास रणदिवे, निलेश देशमुख, रविंद्र  बाबर, भाऊकांत सरवदे, सुभाष गोरे, गणेश दळवी, आदींनी ही कामगिरी केली.

Web Title: arrested 4 speculators in mohol solpaur