केडगावातून पळाले सुप्यात धरले... पहा कोण

arrested six peoples who broke the tire shop
arrested six peoples who broke the tire shop

नगर : नगर-पुणे रस्त्यावर केडगाव शिवारातील अरिहंत टायर्स दुकान फोडणाऱ्या सहा जणांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत सुपे येथे सापळा रचून गजाआड केले. त्यांच्याकडून 22 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 
मनोज उत्तम बोठे (वय 22, रा. पारगाव मौला, नगर), अभिषेक अर्जुन करंजुले (वय 20, रा. पाडळी रांजणगाव, ता. पारनेर), बाळासाहेब रामभाऊ पुंड (वय 40, रा. शिंगवे तुकाई, नगर) व अन्य तीन अल्पवयीन मुलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. 

केडगाव येथील अरिहंत टायर्सच्या दुकानातून चोरांनी सुमारे 20 लाख रुपयांचे टायर व अन्य साहित्य लंपास केले होते. याबाबत प्रीतेश संजय बाफना यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलिस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांनी गुन्ह्याचा शोध सुरू केला असता, सुपे येथे काही लोक टायर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी सकाळी सुपे येथे सापळा रचून वरील आरोपींना ताब्यात घेतले. 

चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून टायर भरलेला टेम्पो, पिकअप व दुचाकी असा एकूण 22 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ, पोलिस नाईक गणेश धोत्रे, शाहीद शेख, नितीन शिंदे, भारत इंगळे, सुजय हिवाळे, पी. आर. राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com