उजनी जलाशयावर मच्छिघारीचे आगमण

राजाराम माने
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

केत्तूर (सोलापूर) : मूळ इंग्लंडचा परंतू नेपाळच्या खोऱ्यात विणीसाठी वास्तव्याला असणारी "मच्छीघार" सद्या उजनीवर इतर स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांच्या गर्दीत मासेमारी करत वावरताना आढळल्याची माहिती पक्षी अभ्यासक डॉ.अरविंद कुंभार यांनी दिली. या घारीला 'उजनी'तील 'चिलापी' मासा आवडीचा असल्याचे सांगितले जाते. 

केत्तूर (सोलापूर) : मूळ इंग्लंडचा परंतू नेपाळच्या खोऱ्यात विणीसाठी वास्तव्याला असणारी "मच्छीघार" सद्या उजनीवर इतर स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांच्या गर्दीत मासेमारी करत वावरताना आढळल्याची माहिती पक्षी अभ्यासक डॉ.अरविंद कुंभार यांनी दिली. या घारीला 'उजनी'तील 'चिलापी' मासा आवडीचा असल्याचे सांगितले जाते. 

या वर्षी 'उजनी'वर देशी-विदेशी पक्ष्यांची अभूतपूर्व गर्दी झाली असून त्यात अनेक स्थलांतरित शिकारी पक्ष्यांचा समावेश आहे. मोरघार, मीनखाई, मासाघार, काकणघार इत्यादी नामावळी असलेल्या या महाकाय शिकारी फक्ष्याला इंग्रजित अॅस्प्रो (Ospro) या नावाने ओळखतात. याचे शास्त्रीय नाव पॅन्डियन हॅलियटस (Pandion haliaetus ) असे आहे. 
 
सामान्य घारी पेक्षा मोठ्या आकाराच्या या स्थलांतरित घारीबद्दल डॉ.कुंभार यांनी दिलेली माहिती अशी त्याचे डोके, मान व छाती पांढरे शुभ्र असून शरीराचा पृष्ठभाग गडद उदी रंगाचा असतो. चोच अणुकुचिदार व पायाची नखे तीक्ष्ण असतात. पंख खूप मोठे असून ते उडताना एका पंखांचे विस्तार सुमारे तीन फूट इतके होते.  या पक्ष्याचे प्रमुख खाद्य मासे असून दिवसभर ही घार पाण्याच्या पृष्ठभागावर उड्डाण घेत मासेमारी करण्यात व्यस्त असते. मासे टिपताना हे शिकारी पक्षी पण्याच्या ठिकाणी वीस ते तीस फूट उंचीवर ससाणासारखे हवेत एकच ठिकाणी तरंगत पाण्यातील माशांना लक्ष्य करतात. ऊंचीवरून पाण्यात अती वेगाने सूर मारून पाण्यातील माशांची शिकार करण्याचे या पक्ष्यांतील दृश्य विलोभनीय असते. सामान्यपणे किलो दोन किलो वजनाचे मासे ही शिकारी घार लीलया उचलून नेते. 

या पक्षांमध्ये वीणकाळ मार्च व एप्रिल महिन्यात असतो. वीण काळात नर मादी जोडीने हिमालय व काश्मीरच्या खोऱ्यातील उत्तुंग झाडांच्या फांद्यांवर घरटे बांधून नवजात पिल्लांना जन्म घालतात. नंतर पावसाळ्यात ब्रिटनकडे निघून जातात. पुन्हा हिवाळ्यात भारतीय उपखंडात हिवाळी पाहुणे म्हणून येऊन दाखल होतात.

 

Web Title: arrival of Ospro on the Ujanee Water reservoir