विद्यार्थ्यांनी बनविली चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

सोलापूर - महात्मा बसवेश्‍वर जयंतीनिमित्त शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने जुळे सोलापुरातील गणेश नाईक प्राथमिक शाळा व मातोश्री मलकव्वा हणमंतप्पा बिराजदार-पाटील प्रशालेत बुधवारी चिमण्यांसाठी घरटी बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. 

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची आवड वाढिस लागावी तसेच पक्ष्यांविषयी गोडी निर्माण होऊन त्यांच्या संवर्धनासाठी मुलांनी पुढाकार घ्यावा म्हणून नेचर कॉन्झर्वेशनच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. 

नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे सदस्य शिक्षक शिवानंद हिरेमठ, सचिन पाटील, संतोष धाकपाडे, पप्पू जमादार यांनी टाकाऊ वस्तूंपासून चिमणीसाठी कृत्रिम घरटे कसे बनवायचे याचे प्रात्याक्षिक दाखविले. या वेळी शाळेचे व्यवस्थापक रे. भि. गुरव, उपाध्यक्ष पी. व्ही. स्वामी, मुख्याध्यापिका सुरेखा बिराजदार, शिक्षिका स्मिता पाटील, मायादेवी पवार, पद्मावती बोळकवठेकर, शिक्षक सिद्धेश्‍वर पाटील, संतोष हिरेमठ, अजीज जमादार, बालाजी सपाटे, लालसिंग चव्हाण, मदन पोलके, इको फ्रेंडली क्‍लबचे अध्यक्ष अरविंद म्हेत्रे आदी उपस्थित होते. 

याच कार्यक्रमात बालकामगार प्रकल्पातील सुवर्णा पावटे, पूनम गणेशकर, आकांक्षा दीक्षित, नविना संघा आदींनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक कागदी पिशव्या बनविण्याबद्दल मार्गदर्शन केले.

Web Title: Artificial nest boxes for sparrows