उड्डाण कृत्रिम पावसासाठी; तिजोरी भरली महापालिकेची

Artificial-Rain-Aeroplane
Artificial-Rain-Aeroplane

45 दिवसांत 90 उड्डाणे; 1.80 लाखांचे मिळाले उत्पन्न
सोलापूर - गेल्या दीड महिनाभरात दिवसातून दोन वेळेला आकाशात भिरभिरणाऱ्या विमानांना पाहून सोलापूरचे विमानतळ सुरू झाले की काय, असा भ्रम शहरवासीयांचा झाला होता. मात्र, ही उड्डाणे होती कृत्रिम पावसाच्या अभ्यासासाठी, कृत्रिम पाऊस पडला की नाही, याबाबत खात्रीशीर माहिती नाही. मात्र, पालिकेच्या तिजोरीत मात्र तब्बल 1.80 लाखांच्या उत्पन्नरूपी "गारा' पडल्या.

सोलापूर शहरात कृत्रिम पाऊस पडण्यासाठी ढगांतून विमाने फिरवण्यात आली. त्यासाठी सकाळी आणि दुपारी अशा दोन वेळेला विमाने फिरवण्यात आली. उड्डाणावेळी अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाचे वाहन तैनात ठेवावे लागते. त्यासाठी प्रतिफेरी अग्निशमन शुल्क एक हजार आणि आरोग्य विभाग वाहनासाठी एक हजार असे शुल्क आकारले जाते. कृत्रिम विमानासाठी 45 दिवस रोज दोन वेळेला उड्डाण करण्यात आले. प्रत्येक उड्डाणाच्या काहीवेळ आदी ही वाहने विमानतळावर सज्ज असत. त्यापोटी हे उत्पन्न महापालिकेस मिळाले आहे.

विमानतळावर सुरक्षेसाठी फोमची सुविधा असलेले वाहन लागते. अचानकपणे एखादी दुर्घटना झाली तर तातडीने कार्यवाही करता येईल यादृष्टीने वाहन सज्ज ठेवावे लागते. आरोग्यविभागाच्या वाहनामध्येही तज्ज्ञ डॉक्‍टर, विमानात बसलेलेल्या व्यक्तींच्या "रक्तगटा'च्या बाटल्या, कोणत्याही आरोग्यविषयक समस्याला सामोरे जाता येईल, तातडीने उपचार करता येईल यानुसार अतिदक्षता उपचार पथक सज्ज ठेवलेले असते. सुदैवाने एकही दुर्घटना झाली नाही. मात्र, सुरक्षा आणि व्यवस्थेपोटी महापालिकेच्या तिजोरीत 1.80 लाखांचा भरणा मात्र झाला.

आकडे बोलतात...
एकूण दिवस - 45
रोजची उड्डाणे - 2
एकूण उड्डाणे - 90
प्रतिउड्डाण शुल्क - 2 हजार रुपये
मिळालेले उत्पन्न - 1.80 लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com