माझ्या मागून आले अन्‌ महाडिक नेते झाले - अरूण नरके

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

कोल्हापूर - (कै) आनंदराव पाटील-चुयेकर यांनी १९७८ मध्ये मला जिल्हा दूध संघात (गोकुळ) आणले. मग काही वर्षांनी मी महादेवराव महाडिक यांना गोकुळमध्ये आणले. त्यांनी तर गोकुळ ताब्यातच घेतले. आता ते माझे नेते आहेत, अशी मिश्‍कील टिप्पणी ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके यांनी केली. कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनच्या किट वाटप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात अरुण नरके यांचाही अमृतमहोत्सवा निमित्त गौरव करण्यात आला. या वेळी खेळाचा जीवनातील उपयोग याबद्दल नरके यांनी नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन केले. 
ते म्हणाले, ‘खेळांडूमधील गुण ओळखणे आणि त्यांचा गौरव करणे आवश्‍यक आहे. खेळाडूंचा सत्कार करण्याची पद्धत मी ‘गोकुळ’मध्ये सुरू केली. आता संचालक प्रत्येक तालुक्‍यातील खेळाडूंना गोकुळ कार्यालयात आणून सत्कार करतात. तेजस्विनी सावंत, वीरधवल खाडे यांना मीच शोधले. एवढेच काय महादेवराव महाडिकांनाही मीच ‘गोकुळ’मध्ये आणले. नंतर त्यांनी गोकुळ ताब्यातच घेतले. आता ते माझे नेते आहेत. महादेवराव महाडिक देखील चांगले कुस्तीपटू आहेत. १९७८ पासून मी गोकुळमध्ये आहे. प्रत्येक निवडणुकीत मी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. 

Web Title: Arun Narke comment