लोंघे (ता. गगनबावडा) - कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्गावर लोंघे येथे खासगी प्रवासी बसला लागलेली आग.
लोंघे (ता. गगनबावडा) - कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्गावर लोंघे येथे खासगी प्रवासी बसला लागलेली आग.

बस पेटून दोघांचा होरपळून मृत्यू

असळज - कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्गावर लोंघे (ता. गगनबावडा) गावाजवळ आरामबस जळून खाक झाली. यात बंटीराज भट (वय 24, रा. रोशनपुरा, भोपाळ, मध्य प्रदेश) व विकी मदन भट (वय 24, हडपसर, इंदिरानगर, गल्ली नं.2, पुणे) या दोन प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडली. ही बस आत्माराम ट्रॅव्हलसची असून, बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आराम बस (यूपी 62 एटी 6362) गुरुवारी रात्री साठेआठला मडगाव (गोवा) येथून मुंबईकडे निघाली. यात चालकासह अठरा प्रवासी होते. मृत बंटीराज व विकी भट इतर साथीदारांसह मडगाव येथे लग्न समारंभात वाजंत्री म्हणून गेले होते. तेथून परतत असताना प्रवासात मद्यपान करून दोघे बसमध्ये दंगामस्ती करत होते. त्यांच्या धूम्रपानाचा प्रवाशांना त्रास होऊ लागल्यामुळे बसचालकाने त्यांना मद्यपान करू नका, असे सांगितले. मात्र, बंटी व विकी यांचे मित्रही मद्यधुंद असल्यामुळे त्यांनी चालकाच्या विनंतीला जुमानले नाही.

लोंघेजवळ दिवे बंद पडल्यामुळे बस रस्त्याकडेला घेऊन चालक शहाबाज रखांगी काय झाले, हे पाहण्यासाठी खाली उतरले. त्या वेळी बसने पुढील बाजूने पेट घेतल्याचे दिसले. चालकाने प्रसंगावधान राखून प्रवाशांना जागे करून बसमधून उतरविले. आगीने रौद्ररूप घेतल्याने संपूर्ण बसने पेट घेतला. प्रवाशांना उतरवत असताना चालकाने मागील बाकावर मद्यधुंद अवस्थेत झोपी गेलेल्या बंटीराज व विकीला जागे करण्याचा प्रयत्न केला होता; पण इतर प्रवाशांना वाचविण्याच्या धडपडीत ते दोघे उतरले की नाही, हे अंधारात त्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे बंटीराज व विकी यांचा होरपळून मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com