'अवनीला ठार करणारा असगर अली दोषी असेल तर कारवाई'
कऱ्हाड : अवनी वाघिणीला ठार करणारा असगर अली दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई होईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. जंगलातल्या वाघासह मुंबईतल्या वाघाच्या संवर्धनाचेच काम मी केले, असे म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेनेला कोपरखळी मारली.

कराडमध्ये व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, 'शिवसेना-भाजप मैदान मे आती है तो, काँग्रेस-राष्ट्रवादी चारो खाने चित हो जाती है. भाजप आणि शिवसेना युती ही महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे. राजकारणापलीकडे राज्यात जनतेचे व्यापक हित पाहिले पाहिजे. गेल्या पंधरा वर्षात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या हातात सत्ता दिली. त्यांच्याकडून जी प्रगती व्हायची होती ती झाली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने दहापटीने प्रगती केली असेल तर आमचे सरकार शंभर पटीने जास्त प्रगती करत आहे. सर्व प्रश्न पाच वर्षात सुटणार नाहीत हे खरं आहे. मात्र विकासासाठी वेगाने प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रातील जनता भाजप-शिवसेना युतीच्या बाजूने आहे. शिवसेना-भाजप मैदान मे आती है तो काँग्रेस-राष्ट्रवादी चारो खाली होती है