आष्टा पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकारी तेजश्री पवार लाच घेताना जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

पूर्वीच्या भांडणातून 24 जून 2018 रोजी बावची ता वाळवा येथे तिघा जणांमध्ये जोरदार मारामारी झाली होती. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात कलम 307 नुसार खुनाचा प्रयत्न गुन्हा नोंद झाला आहे.

आष्टा : आष्टा पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तेजश्री धनाजी पवार यांना पंधरा हजार रुपयांची लाच घेत असताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. महिला पोलिस अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने सांगली जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

पूर्वीच्या भांडणातून 24 जून 2018 रोजी बावची ता वाळवा येथे तिघा जणांमध्ये जोरदार मारामारी झाली होती. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात कलम 307 नुसार खुनाचा प्रयत्न गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांच्याकडे होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली. अटकेत असलेल्या दोघांना याप्रकरणात मदत करण्यासाठी उपनिरीक्षक पवार व  काकाचीवाडी येथील खाजगी व्यक्ती यांनी 30 हजार रुपयांची मागणी केली होती. 27 जून रोजी याबाबतचा व्यवहार ठरला होता.

संशयित आरोपीच्या मावसभावाने याबाबतची माहिती लाचलुचपत विभागाला दिली होती. पहिला टप्पा म्हणून पंधरा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. पोलिसांत तेजश्री पवार, नोमान फिरोज वठारे यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे

Web Title: Ashta police stations API Tejashri Pawar caught taking bribe