आष्टी उपसा सिंचन योजना लागणार मार्गी

राजकुमार शहा 
मंगळवार, 17 एप्रिल 2018

मोहोळ - शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडविणाऱ्या महत्वाकांक्षी आष्टी उपसा सिंचन योजनेच्या डाव्या कालव्याच्या कामातील अडसर आता दुर झाला आहे. लवकरच बैरागवाडी मोडनिंब शेटफळ या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळणार असल्याची माहिती अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी दिली. 

आष्टी उपसा सिंचन योजनेच्या डाव्या कालव्याचे काम जवळ जवळ पुर्ण होत आले आहे. मात्र मधल्या सातशे मिटरच्या टप्प्यात अडचण आली होती. सभापती डोंगरे यांनी त्यांच्या स्तरावर संबंधीत शेतकऱ्याबरोबर चर्चा करून त्यातुन मार्ग काढला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी समाधानी झाला आहे. हा डावा कालवा पंढरपूर शेटफळ हा राज्य मार्ग व रेल्वे मार्ग छेदुन पूढे जातो. दोन्हीही विभागाकडुन खर्चाची अंदाजपत्रके मागविली आहेत. तर रेल्वेमार्ग छेदण्यासाठीच्या सर्व्हेसाठी रेल्वे विभागाकडे पाच लाख रुपये पाटबंधारे विभागाने भरले आहेत. दोन्ही विभागाची अंदाजपत्रके येताच त्यांच्या कड़े निधी वर्ग करून पुलाची कामे करण्यात येणार आहेत. 

या कालव्याच्या अपुर्ण कामासाठी डोंगरे यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातुन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार लवकरच अपुर्ण कामे पुर्ण करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी देण्याची सुचना पालक मंत्री देशमुख यांनी जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे सभापती डोंगरे यांनी दिली.

शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी देण्यासाठी आम्हीही प्रयत्नशील आहोतच, शेटफळ पंढरपूर रस्त्यावरील पुलाचे काम व रेल्वे मार्ग पार करण्याबाबतचे अंदाजपत्रके येताच कामाला गती येईल.
बाळासाहेब जाधव (सहायक अभियंता जलसंपदा विभाग)

Web Title: Ashti Irrigation Scheme will be implemented