नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबास शासनाकडुन मदत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

पांगरी : नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेले कारी (ता.बार्शी) येथील शेतकरी शिवाजी सुरवसे यांचे वारस पत्नी व मुलगा यांना शासनाच्या वतीने तहसीलदार ऋषीकेत शेळके यांच्या हस्ते तातडीची मदत म्हणून चार लाखाचा धनादेश देण्यात आला. यावेळी मंडलाधिकारी डोईफोडे, तलाठी गायकवाड, पोलीस पाटील अमृता माळी, उमेश डोके, प्रसाद डोके, भिमराव माळी, सरपंच चंद्रकला विधाते, सदस्य खासेराध विधाते, विजयसिंह विधाते, आण्णासाहेब करळे, मनोज व्हटकर, दत्ता देसाई आदी उपस्थित होते.   

कारी येथील शेतकरी शिवाजी नवनाथ सुरवसे हे मंगळवारी(ता.15) शेतातील काम उरकून घराकडे परतत असताना अचानक आलेल्या वादळी वारा विजांचा कडकडाट होऊन त्यांच्या अंगावर विज पडली. त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्याने त्यांना शासनाकडून तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी चार लाख तातडीच्या मदतीचा धनादेश देऊन सुरवसे कुटुंबियांचे सांत्वन करण्यात आले. त्याचबरोबर शासनामार्फत राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना, शेतकरी अपघात योजनेचा प्रस्ताव ही लवकरच सादर करून लवकरच उर्वरित मदत देण्यात येईल असे तहसीलदार शेळके यांनी सकाळशी बोलताना सांगितले. 

Web Title: assistance to the family of the farmer who died in natural calamities