मनपा सहायक आयुक्त हराळेंची जतला बदली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सोलापूर : महापालिकेचे सहायक आयुक्त अभिजीत हराळे यांची जत नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी बदली झाली आहे. उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी सायंकाळी त्यांना कार्यमुक्त केले. हराळे सहा वर्षांपूर्वी सहायक आयुक्त म्हणून रूजू झाले होते. आरोग्य विभागातील फार्मासिस्ट संजय व्हटकर यांच्या आत्महत्याप्रकरणी त्यांच्यासह तिघे जामीनावर आहेत.

वरिष्ठांची परवानगी न घेता परस्पर पंढरपूरला गेल्यामुळे हराळे यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला होता. त्यानुसार प्रस्तावही तयार होता. मात्र हराळेंच्या बदलीचे संकेत मिळाल्याने कारवाईच्या आदेशावर आयुक्तांनी स्वाक्षरी केली नव्हती. दरम्यान, हराळे यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी दुपारी महापालिकेत धडकले व सायंकाळी ढेंगळे-पाटील यांनी त्यांना कार्यमुक्त केले. 

Web Title: Assistant Commissioner Harale transfer from jat