खळबळ! हरिपूरमध्ये हल्लेखोरांकडून तरुणाचा निर्घृण खून; पत्नी जखमी

हरिपूर (ता.मिरज) येथील सुरेश नांद्रेकर (वय 47) यांचा तिघा हल्लेखोरांनी डोक्यावर व तोंडावर वार करुन निर्घृण खून
At Haripur Miraj, three assailants committed the same heinous murder
At Haripur Miraj, three assailants committed the same heinous murder

सांगली : हरिपूर (ता.मिरज) येथील सुरेश नांद्रेकर (वय 47) यांचा तिघा हल्लेखोरांनी डोक्यावर व तोंडावर वार करुन निर्घृण खून केला. सोमवारी रात्री उशिरा हरिपूर रस्त्यावरील गजानन काॅलनीत नांद्रेकर यांच्या शेताजवळ हा प्रकार घडला. हल्ल्यातून पतीला वाचवण्याचा प्रयत्न करणारी नांद्रेकर यांची पत्नी सुद्धा गंभीर जखमी झाली आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

दरम्यान प्राथमिक तपासात तिघा हल्लेखोरांनी हा खून केल्याची माहिती पुढे आली आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु दुचाकी चोरीस गेल्याच्या कारणातून नुकतेच वाद झाला होता. त्यातूनच हा खून झाला असावा अशी चर्चा सुरु आहे. सांगली ग्रामीण पोलिसांनी खूनानंतर घटनास्थळी धाव घेतली. तपासाची चक्रे फिरवून हल्लेखोरांची नावे निष्पन्न करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांच्या हाती काही ठोस माहिती लागली आहे. काही तासातच खूनाचा उलगडा होईल अशी शक्यता आहे. दरम्यान हरिपूर परिसरात काल रात्रीपासून आणि आज सकाळपासून खूनाची चर्चा सुरी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com