वाजपेयींच्या इस्लामपुरातील चित्रमय आठवणी...

धर्मवीर पाटील
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

1982 आणि 1987 मध्ये ते दोनवेळा इस्लामपुरात येऊन गेले. आज त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नगरपालिकेची सुरू असलेली सभा तहकूब करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

इस्लामपूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने त्यांच्या इस्लामपूर भेटीला उजाळा मिळाला. 1982 आणि 1987 मध्ये ते दोनवेळा इस्लामपुरात येऊन गेले. आज त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नगरपालिकेची सुरू असलेली सभा तहकूब करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

atal bihari vajapayee

अटलबिहारी वाजपेयी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना सांगली जिल्हा दौऱ्यावर आले होते. इस्लामपुरात ते दोनवेळा आले. तालुक्यात काँग्रेसचे प्राबल्य असताना भाजप निष्ठेने पक्ष वाढवू पाहात होती. अण्णासाहेब डांगे त्याकाळी भाजपचे राज्याचे उपाध्यक्ष होते. राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी इस्लामपुरात येऊन कार्यकर्त्यांना संबोधित करावे म्हणजे पक्ष वाढीला बळ मिळेल, असा डांगे यांचा आग्रह होता. त्यास्तव वाजपेयी 1982 साली इस्लामपुरात आले. सध्या बसस्थानक असलेल्या भागात त्याकाळी सिमेंट आणि पाईपचा कारखाना होता आणि जागाही मोठी होती. या ठिकाणी वाजपेयी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रचंड पाऊस असतानाही ही सभा झाली आणि वाजपेयी यांनी जनसमुदायासमोर भिजत भाषण केल्याची आठवण माजी मंत्री अण्णासाहेब डांगे सांगतात.  

vajapayee

अटलबिहारी वाजपेयी दुसऱ्यांदा 1987 साली इस्लामपुरात आले होते. तेव्हा ते जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी जुन्या तहसीलदार कचेरीसमोर सभा झाली होती. विद्यमान नगरसेवक बाबासाहेब सूर्यवंशी शहरअध्यक्ष होते आणि अण्णा नवले तालुकाध्यक्ष होते. माजी मंत्री अण्णा डांगे, स्व. अशोक पाटील, स्व. शंकरराव चौधरी यांची या सभेला प्रमुख उपस्थिती होती. या सभेला प्रचंड जनसमुदाय जमला होता. पंढरपूर येथील एक सभा आटोपून वाजपेयी रात्री इस्लामपूरच्या सभेला आले होते. या सभेत कार्यकर्त्यांनी जमवलेला निधी पक्षासाठी वाजपेयींच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. महिलांनी त्यांचे औक्षण केले होते. भाजपच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या घरीही त्यांनी भेट दिली होती.

vajapayee

Web Title: atal bihari vajapayee remembering by citizens of islampur