अटलजींची मंगळवेढा भेट अपूर्णच...

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

मंगळवेढा : संतांची भूमी म्हणून परिचित असलेल्या मंगळवेढ्यातील संत चोखोबांविषयी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आदर होता. पंतप्रधान असताना पंढरपूरच्या मेळाव्यातच मंगळवेढ्याच्या संत भूमीला पंढरपूरातून नमन आणि प्रणाम केला. पण मंगळवेढ्यातील भेट त्याची अपूर्णच राहिली. 

आज दिवसभर शहर व तालुक्यातील भारतीय जनता पक्ष व नागरिकांना दिवसभर हुर हुर लागून राहिली होती. माध्यमातून त्यांच्या प्रकृतीस सुधारणा झाल्याची बातमी कानावर पडण्याच्या प्रतिक्षेत असताना शेवटी अटलजी आपल्यात न राहिल्याची बातमी समजल्यावर शहर व तालुका शोकसागरात बुडाला. पंतप्रधान असताना पंढरपुर येथील सभेत बोलताना चोखोबाची काव्यपंक्ती म्हणत भक्त चोखोबा की जुडी, संतो की भुमी मंगलबेढा नजदीक है, ऊस धरती को मै नमन करता हूँ, जिन्हो ने अपनी सदाचार वृत्ती से भक्ती से स्वर्ण का अमृत भी शुध्द किया था, ऐसे पुण्यात्मो को मेरा प्रणाम, और समरसता भुमी को नमन, अच्युत संत से सवर्ण प्रसाद लेते थे और कृपा आशिर्वाद लेते थे अशा शब्दाबरोबर .मराठीतून ऊस डोंगापरी रस नोहे डोंगा काय भुललासी वरलीया रंगाचा या चोखोबाचा अभंगातून संत चोखोबाबरोबर मंगळवेढ्याचा गौरव केला. त्याच्या आठवणी सांगताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शशीकांत चव्हाण भावूक झाले. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष असताना मुंबईतील एका कार्यक्रमात अटलबिहारीच्या जवळ जाण्याचा योग आला होता.

Web Title: atal bihari vajpayee cannot visit mangalwedha