वाजपेयी यांच्या अस्थींचे चंद्रभागेत विसर्जन

अभय जोशी
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पंढरपूरः माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे आज (गुरुवार) सायंकाळी पाचच्या सुमारास भावपूर्ण वातावरणात चंद्रभागा नदीत विसर्जन करण्यात आले. "अमर रहे- अमर रहे अटलजी अमर रहे " अशा घोषणा देत कार्यकर्ते शोकाकूल झाले होते.

पंढरपूरः माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे आज (गुरुवार) सायंकाळी पाचच्या सुमारास भावपूर्ण वातावरणात चंद्रभागा नदीत विसर्जन करण्यात आले. "अमर रहे- अमर रहे अटलजी अमर रहे " अशा घोषणा देत कार्यकर्ते शोकाकूल झाले होते.

आज दुपारी चारच्या च्या सुमारास पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे सोलापूर येथून अस्थीकलश घेऊन पंढरपूरला आले. पंढरपूर अर्बन बॅंकेजवळ आमदार प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले आदींसह बहुतांष नगरसेवक, नगरसेविका तसेच विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी अस्थीकलशाचे दर्शन घेतले. त्यानंतर अस्थीकलश पंढरपुरातील जिजामाता उद्यानातील हुतात्मा स्मारक येथे दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. तेथून हा अस्थिकलश वारकरी दिंडीसह टाळ मृदंगाच्या गजरात श्री विठ्ठल मंदिराला वळसा घालून संत नामदेव पायरी येथूून चंद्रभागेच्या वाळवंटात आणण्यात आला.

तिथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अस्थींचे चंद्रभागा नदीत विसर्जन करण्यात आले. तिथे पालकमंत्री श्री.देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माजी जिल्हाध्यक्ष काशिनाथ थिटे, बाबासाहेब बडवे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय वाईकर, माजी शहराध्यक्ष उमेश वाघोलीकर, पालिकेतील भाजपाचे गटनेते अनिल अभंगराव, ऍड. संग्राम अभ्यंकर, राजकुमार पाटील, शंकर वाघमारे, श्रीकांत देशमुख, चंद्रकांत बागल, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर, नगरसेवक विक्रम पापरकर, शिरीष कटेकर, गिरीष आराध्ये, दत्तासिंह राजपूत, अजय जाधव, उमेश ढोबळे, कैलास कारंडे, ओंकार बसवंती, शकुंतला नडगिरे आदींसह नगरसेवक, नगरसेविका तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: atal bihari vajpayee mortal remains in Chandrabhaga